कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गोड बातमी ; विहिरीसाठी आता इतक्या लाखाचे अनुदान मिळणार ! अर्ज प्रक्रिया सुरू, कसा करणार अर्ज?

03:49 PM Oct 10, 2024 IST | Krushi Marathi
Vihir Anudan Yojana

Vihir Anudan Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी देखील अनेक कौतुकास्पद योजना राबवल्या जात आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी सुद्धा अनुदान मिळत आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून एकापेक्षा अधिक योजना राबवल्या जात आहेत.

Advertisement

अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विहिरीसाठी अनुदान मिळते तर अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत विहिरीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.

Advertisement

दरम्यान राज्य शासनाच्या या दोन्ही योजनांच्या आर्थिक निकषांमध्ये नुकताच बदल करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने 1 ऑक्टोबरला याबाबतचा निर्णय घेतला असून आता या दोन्ही योजनेच्या माध्यमातून नवीन विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

आधी ही अनुदानाची मर्यादा फक्त अडीच लाख रुपये एवढी होती. मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये अनुदान मिळत होते मात्र बिरसा मुंडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत फक्त अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते.

Advertisement

यामुळे सरकार वीर अनुदान योजनेत एवढा भेदभाव का करते असा सवाल सातत्याने उपस्थित केला जात होता. दरम्यान आता सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष चेंज केले आहेत.

Advertisement

याबाबतचा शासन निर्णय एक ऑक्टोबरला निर्गमित करण्यात आला आहे. नवीन शासन निर्णयानुसार आता या दोन्ही योजनांच्या माध्यमातून नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपयांना ऐवजी चार लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

त्यामुळे आता या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. आधी या योजनेतून नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये मिळत होते आता चार लाख मिळतील, तसेच, या योजनेतून आधी जुन्या विहिरीसाठी 50 हजाराचे अनुदान मिळत होते आता एक लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

शिवाय, इनवेल बोअरिंगसाठी ४० हजार रुपये, विद्युत पंप संच ४० हजार रुपये, वीज जोडणी आकारसाठी २० हजार, सोलर पंपसाठी ५० हजार, शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरणसाठी २ लाख, ठिबक सिंचन संचासाठी ९७ हजार तर तुषार सिंचन संचासाठी ४७ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

पण, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून क्षेत्रांतर्गत आणि क्षेत्राबाहेरील फक्त वनपट्टे धारक शेतकऱ्यांसाठी विंधन विहीर ५० हजार रुपये आर्थिक मर्यादेत अनुदान मंजूर केलं जाणार आहे. एवढेच नाही तर आता या योजनांच्या माध्यमातून डिझेल इंजिनसाठी ४० हजार, एचडीपीई/पिव्हीसी पाईपसाठी ५० हजार, बैलचलित/ट्रॅक्टर चलित अवजारांसाठी ५० हजार आणि परसबागसाठी ५० हजार एवढे अनुदान मंजूर केले जाणार आहे.

यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना निश्चितच आता फायदा होऊ शकणार आहे. वाढत्या महागाईमुळे आधी विहीर खोदण्यासाठी दिले जाणारे अनुदान अपुरे ठरत होते. मात्र आता अनुदानाची रक्कम वाढवली गेली आहे. म्हणून आता या योजनेला चांगला उदंड प्रतिसाद मिळणार असे जाणकारांनी म्हटले आहे.

Tags :
Vihir Anudan Yojana
Next Article