आता ‘या’ शेतकऱ्यांना देखील मिळणार विहीर बांधण्यासाठी 4 लाखाचे अनुदान! सरकारने योजनेमध्ये केला बदल
Sinchan Vihir Yojana:- शेती आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा अनेक योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या राबवल्या जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून सरकारचा प्रयत्न आहे व त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे हा प्रमुख उद्देश आहे.
या योजनांच्या माध्यमातून अनेक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपामध्ये मदत करण्यात येते. अशा अनेक योजनांमध्ये जर आपण राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणारी सिंचन विहीर योजना बघितली तर ही एक महत्त्वाची योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगाच्या अंतर्गत विहीर बांधण्याकरिता चार ते पाच लाख रुपयांचे अनुदान मिळते.
शेती सिंचनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता अल्पभूधारक शेतकऱ्यांना या माध्यमातून लाभ दिला जातो. परंतु महत्त्वाचे अपडेट अशी आहे की, या योजनेमध्ये आता सरकारने एक महत्त्वाचा बदल केला आहे.
शासन निर्णयानुसार आता भोगवटादार वर्ग-2 जमीनधारक शेतकऱ्यांना देखील मिळेल लाभ
राज्यातील कोरडवाहू जमिनी बागायतीमध्ये रूपांतरीत व्हाव्यात याकरिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर योजना राबवली जाते व या माध्यमातून शेतकऱ्यांना विहिरीसाठी चार लाखापर्यंतचे अनुदान मिळते.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या योजनेमध्ये आता बदल करण्यात आला असून शासनाच्या 2025 च्या निर्णयानुसार भोगवटादार वर्ग-2 शेतकऱ्यांना देखील या योजनेमध्ये आता समाविष्ट करण्यात आलेले आहे. अशा शेतकऱ्यांना देखील आता या योजनेच्या माध्यमातून विहिरीसाठी अनुदानाचा फायदा मिळणार आहे.
या योजनेचा लाभ कसा घेता येतो?
यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या तालुका कृषी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज जमा करू शकतात. याकरिता सातबारा उतारा तसेच जमीन धारकाचा दाखला, ओळखपत्रासाठी आधार कार्ड तसेच पाणी स्त्रोताचा दाखला व भोगवटादार वर्ग-2 असल्याचा पुरावा तुम्हाला जमा करावा लागतो. तसेच….
ऑनलाइन पद्धतीने
जर तुम्हाला अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारच्या अधिकृत पोर्टलवर देखील तुम्हाला अर्ज सादर करता येतो. अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची पडताळणी होते व त्यानंतर तुम्हाला लाभ मंजूर केला जातो व या माध्यमातून विहिरीच्या खोदकामासाठी जी काही रक्कम मंजूर होते ती थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.
भोगवटादार वर्ग-2 शेतकऱ्यांना देखील आता या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळू शकणार आहे. कोरडवाहू शेती बागायती करण्यासाठी सरकारचा हा निर्णय खूप महत्त्वाचा ठरेल अशी शक्यता आहे.
सिंचन विहीर योजनेचा लाभ हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, सामान्य प्रवर्गातील शेतकरी इत्यादींना मिळतो. म्हणजेच या बदलामुळे आता सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेणे शक्य झाले आहे.
या योजनेअंतर्गत कोणत्या बाबींसाठी मिळते अनुदान?
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहिरीसाठी जास्तीत जास्त पाच लाख रुपयांचे अनुदान मिळते. यामध्ये विहिरीचे खोदकाम, विहिरीसाठी रिंग ओतणे किंवा मजबुतीकरणासाठी देखील अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांकडे पाणी स्त्रोत असल्याचा दाखला असणे यासाठी आवश्यक आहे व जमीनधारक म्हणून शेतकऱ्याचे नाव सातबारावर असणे देखील गरजेचे आहे.