कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

दिवाळीच्या मुहूर्तावर सोयाबीनला काय दर मिळतोय? महाराष्ट्रातील कोणत्या बाजारात मिळाला सोयाबीनला सर्वाधिक भाव ? वाचा....

01:35 PM Nov 01, 2024 IST | Krushi Marathi
Soybean Rate

Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. सोयाबीन पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असून गेल्या दोन वर्षांपासून हे पीक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

Advertisement

याचे कारण म्हणजे सोयाबीनचे उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत आहे आणि दुसरे म्हणजे सोयाबीनला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाहीये.

Advertisement

तथापि आजही राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीनला दुसरा पर्याय दिसत नाही. यंदाही राज्यात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून अनेक ठिकाणी सोयाबीनची आवक वाढत आहे.

विजयादशमी झाल्यानंतर सोयाबीनची आवक वाढते यानुसार यंदाही विजयादशमीनंतर सोयाबीनची आवक वाढू लागली आहे. दरम्यान आज आपण दिवाळीच्या मुहूर्तावर सोयाबीनला महाराष्ट्रात काय दर मिळतोय यासंदर्भात माहिती पाहणार आहोत.

Advertisement

दिवाळीच्या मुहूर्तावर सोयाबीनला काय भाव मिळाला

Advertisement

परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती : मराठवाड्यातील या बाजारात सोयाबीनला किमान 4200, कमाल 4450 आणि सरासरी 4350 असा भाव मिळाला आहे.

देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात सोयाबीनला किमान 3000, कमाल 4200 आणि सरासरी 3900 असा भाव मिळाला आहे.

मुखेड कृषी उत्पन्न बाजार समिती : दिवाळीच्या मुहूर्तावर या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 3800, कमाल 4425 आणि सरासरी 4400 असा दर मिळाला आहे.

बार्शीटाकळी कृषी उत्पन्न बाजार समिती : राज्यातील या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 3650, कमाल 4350 आणि सरासरी 4150 असा भाव मिळाला आहे.

उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात सोयाबीनला किमान 4,300, कमाल 4400 आणि सरासरी चार हजार 350 असा भाव मिळाला आहे.

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 2500, कमाल 4000 आणि सरासरी 3700 असा भाव मिळाला आहे.

Tags :
FarmerFarmer IncomeSoyabean BajarbhavSoyabean PriceSoybean APMCSoybean Market Ratesoybean rate
Next Article