कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

Sarkari Anudan Yojana: सरकार देत आहे कृषी पर्यटनासाठी लाखोंच अनुदान… करा जादा कमाई

01:11 PM Mar 09, 2025 IST | Krushi Marathi
agri tourism

Sarkari Anudan Yojana:- कोणताही व्यवसाय सुरू करताना आर्थिक मदतीसाठी अनुदान मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, त्यासाठी व्यवसायाची अधिकृत नोंदणी असणे आवश्यक असते. कृषी पर्यटन केंद्र सुरू करताना विविध परवाने आणि प्रमाणपत्रांसाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी प्रक्रियेबद्दल जाणून घेण्यापूर्वी, कृषी पर्यटन केंद्रांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध लाभांविषयी माहिती घेऊया.

Advertisement

कृषी पर्यटन केंद्रांना मिळणारे शासनाचे लाभ

Advertisement

कृषी पर्यटन केंद्रांना पर्यटन विभागाकडून अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते, ज्यामुळे केंद्र चालकांना बँकांकडून कर्ज मिळणे सुलभ होते. तसेच, नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रांना पर्यटन धोरण-2016 अंतर्गत वस्तू आणि सेवा कर, वीज दर (मुद्रांक शुल्क सवलत वगळता) यांसारख्या विविध सवलती मिळतात.

जलसंधारण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या शेततळे योजनेत कृषी पर्यटन केंद्रांना प्राधान्य दिले जाईल, तसेच ग्रीन हाऊस, फळबाग आणि भाजीपाला लागवडीसारख्या योजनांचा लाभ देखील मिळू शकेल. ज्या केंद्रांमध्ये घरगुती स्वयंपाकगृह असेल, त्यांना घरगुती गॅस जोडणीचा लाभ मिळेल, तसेच कृषी पर्यटन केंद्रांसाठी घरगुती वीज दर लागू करण्याचा विचार केला जाईल.

Advertisement

शासनाकडून मिळेल मार्गदर्शन आणि प्रशिक्षण

Advertisement

शासनाकडून प्रशिक्षण आणि मार्गदर्शनदेखील दिले जाते. अन्न सुरक्षा, स्वच्छता, आतिथ्य, प्रसिद्धी आणि विपणन, आदर्श शेती पद्धती आणि अनुभवाधारित पर्यटन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर अनुभवी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळते. याशिवाय, कृषी पर्यटन केंद्रांची माहिती पर्यटन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते, त्यामुळे केंद्रांची अधिकृत ओळख निर्माण होते.

विपणनासाठी खासगी आणि शासकीय मार्ग तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो, ज्यामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अधिक गतिमान होतो. आठ खोल्यांपर्यंतच्या केंद्रांसाठी नगररचना विभागाची परवानगी आवश्यक राहणार नाही, त्यामुळे लहान कृषी पर्यटन केंद्रांना मोठा फायदा होऊ शकतो.

नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया:

कृषी पर्यटन केंद्रासाठी नोंदणी करण्यासाठी इच्छुक व्यावसायिकांना पर्यटन संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. तसेच, प्रादेशिक उपसंचालक, पर्यटन संचालनालय कार्यालयातही अर्ज उपलब्ध असतात.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये अर्जदाराच्या जमिनीचे 7/12 उतारे आणि 8अ, व्यक्तीशिवाय इतर अर्जदारांसाठी कायदेशीर नोंदणी प्रमाणपत्र, अधिकृत संस्थांसाठी प्राधिकरण पत्र, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, वीज बिल, अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत परवाना (Food License) आणि लोकनिवास (Dormitory) असल्यास बांधकाम परवानगीचे प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.

नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी केली जाते. पर्यटन उपसंचालक आणि कृषी विभाग प्रतिनिधी स्थळ पाहणी करून आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यास नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. जर अर्जदाराने धोरणातील अटी पूर्ण केल्या नाहीत, तर नोंदणी नाकारण्याचा अधिकार उपसंचालकांकडे राहतो. तसेच, नियमांचे उल्लंघन झाल्यास नोंदणी प्रमाणपत्र निलंबित किंवा रद्द करण्यात येऊ शकते.

नोंदणी शुल्क आणि नूतनीकरण प्रक्रिया

कृषी पर्यटन केंद्रासाठी प्रथम नोंदणी शुल्क रु. 2,500 असून, प्रत्येक पाच वर्षांनी नूतनीकरण शुल्क रु. 1,000 भरावे लागते. ही सेवा लोकसेवा हक्क अधिनियमान्वये अधिसूचित करण्यात येणार आहे.

कृषी पर्यटन नोंदणीमुळे व्यवसाय अधिकृत होतो आणि त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेत व्यवसाय वाढवता येतो. त्यामुळे इच्छुक व्यावसायिकांनी आवश्यक कागदपत्रांसह त्वरित नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या अनुदान आणि सुविधांचा लाभ घ्यावा.

Next Article