कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

महिला शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक बळकटी! सरकारकडून 80 टक्के सबसिडीसह मिळणार 15000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान

05:49 PM Feb 13, 2025 IST | Krushi Marathi
namo drone didi yojana

Scheme For Women:- महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ‘नमो ड्रोन दीदी योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना शेतीमध्ये ड्रोनचा उपयोग करून त्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करणे हा आहे. शेतीत ड्रोनच्या मदतीने औषध आणि खतांची फवारणी, पिकांची तपासणी तसेच विविध कृषी कामे सुलभ आणि जलद होतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि मेहनत वाचेल. तसेच उत्पन्नात वाढ होईल.

Advertisement

काय आहे केंद्र सरकारचा निर्णय?

Advertisement

केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता गट (SHG) सदस्य असलेल्या महिलांना ड्रोनच्या प्रशिक्षणासह आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना ड्रोन वापरण्याचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल.ज्यामुळे त्या स्वतःच्या शेतीमध्ये त्याचा उपयोग करू शकतील तसेच इतर शेतकऱ्यांसाठीही सेवा देऊ शकतील.

या योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन खरेदीसाठी 80% अनुदान दिले जाणार असून त्याची मर्यादा 8 लाख रुपये आहे. उर्वरित रक्कम भरण्यासाठी महिलांना 3% व्याजदराने AIF (Agriculture Infrastructure Fund) अंतर्गत कर्ज दिले जाणार आहे. याशिवाय महिलांना 15,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देखील मिळणार आहे. जेणेकरून त्या आपल्या व्यवसायाची सुरुवात अधिक सुकरपणे करू शकतील.

Advertisement

ड्रोन किटमध्ये काय मिळेल?

Advertisement

ड्रोनच्या किटमध्ये अत्याधुनिक ड्रोन यंत्रणा, चार बॅटरी, चार्जिंग हब आणि ड्रोन नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपकरणे दिली जाणार आहेत. योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी काही पात्रता निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. अर्जदार महिला ही भारतीय नागरिक असावी आणि तिचे वय 18 ते 37 वर्षांदरम्यान असावे. त्याचबरोबर,

तिने स्वयंसहाय्यता गटाचे (SHG) सदस्यत्व घेतलेले असावे आणि तिच्या नावावर स्वतःची शेती असावी. अर्ज करताना महिलांना आधार कार्ड, स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, फोन नंबर आणि ईमेल आयडी, पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच SHG ओळखपत्र आवश्यक असेल.

शेतीमध्ये ड्रोनचा वापर

ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग करता येतो. पारंपरिक पद्धतींमध्ये शेतकऱ्यांना मजुरी आणि वेळेचा मोठा खर्च करावा लागतो. मात्र ड्रोनच्या मदतीने नॅनो-खते आणि कीटकनाशकांची फवारणी अधिक जलद आणि अचूकपणे करता येईल.

तसेच जमिनीचे सर्वेक्षण आणि मोजणीसाठी देखील ड्रोन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ड्रोनच्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची स्थिती दूरूनही तपासता येईल. त्यामुळे उत्पादनामध्ये मोठी वाढ होईल.

कुठे कराल अर्ज?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी pmkisan.gov.in किंवा agricoop.nic.in या अधिकृत सरकारी वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया सोपी असून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर मंजुरी मिळेल.

ही योजना महिलांसाठी आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी मोठी संधी आहे. पारंपरिक पद्धतींऐवजी ड्रोनचा वापर केल्यास वेळ आणि मेहनत वाचेल व उत्पादन वाढेल आणि शेती अधिक फायदेशीर ठरेल. त्यामुळे इच्छुक महिलांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.

Next Article