आज लाल कांद्याला मिळाला सरासरी 2500 रुपये क्विंटल दर! वाचा कोणत्या बाजारपेठेत किती झाली आवक आणि किती मिळाला दर?
Onion Market Price Today:-महाराष्ट्रातील बाजारपेठेमध्ये आज लाल कांद्याची बऱ्यापैकी आवक झाल्याचे दिसून आले. संपूर्ण राज्यातील बाजारांमध्ये 22836 क्विंटल कांद्याची आवक आज झाली व मिळालेले दर जर बघितले तर किमान 1425 रुपयापासून दर मिळाले तर सरासरी 2500 रुपये प्रतिक्विंटल इतकी राहिली.
यामध्ये जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर बाजार समितीचा विचार केला तर या ठिकाणी आज किमान पाचशे रुपये तर सरासरी 2300 इतका दर मिळाला व त्याखालोखाल राहता बाजार समितीमध्ये किमान चारशे रुपये तर सरासरी 2100 रुपये दर मिळाला.
तसेच सर्वसाधारण कांद्याला छत्रपती संभाजीनगर बाजारामध्ये कमीत कमी साडेपाचशे तर सरासरी 1425, दौंड केडगाव बाजारात कमीत कमी 700 तर सरासरी 2500 रुपये इतका दर मिळाल्याचे आज दिसून आले.
तसेच लोकल कांद्याला पुणे पिंपरी बाजारामध्ये कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी दोन हजार रुपये तर मंगळवेढा बाजारात कमीत कमी सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी 2200 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.
राज्यातील काही महत्त्वाच्या बाजार समित्यांमधील आजचे लाल कांद्याचे दर
1- राहता बाजार समिती- या ठिकाणी आज लाल कांद्याची 1794 क्विंटल आवक झाली व किमान 400 ते कमाल 3200 रुपये इतका दर मिळाला व दराची सरासरी 2100 रुपये इतकी राहिली.
2- पारनेर बाजार समिती- पारनेर बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 14750 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी किमान पाचशे रुपये तर कमाल 3300 इतका दर मिळाला व दराची सरासरी 2300 रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.
3- छत्रपती संभाजी नगर- छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 2917 क्विंटल कांद्याची आवक झाली व त्या ठिकाणी किमान 550 तर कमाल 2300 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला व दराची सरासरी 1425 रुपये प्रतिक्विंटल इतकी राहिली.
4- कराड बाजार समिती- या बाजार समितीमध्ये आज 210 क्विंटल कांद्याची आवक झाली व किमान एक हजार रुपये प्रतिक्विंटल तर कमाल पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला व सरासरी देखील 2500 रुपये प्रति क्विंटल इतकीच राहिली.
5- पुणे-पिंपरी बाजार समिती- या बाजार समितीत लोकल कांद्याची १३ क्विंटल कांद्याची आवक झाली व किमान 1000 रुपये तर कमाल 3000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला व दराचे सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.
या बाजारभावावरून आपल्याला दिसून येते की आज कांद्याला सरासरी 1425 ते 2500 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळाला