लाडक्या बहिणींना मिळणारे 1500 रुपये त्यांना आता कमावून देतील लाखो रुपये! सरकार बनवत आहे परफेक्ट प्लॅनिंग
Majhi Ladki Bahin Yojana:- महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्त्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला लाभार्थी महिलेच्या खात्यावर जमा करण्यात येतात. त्यामुळे महिलांना या पंधराशे रुपयांची मदत त्यांच्या कुटुंबासाठी अनेक अर्थाने होऊ शकते.
जरी काही लोकांना ही 1500 रुपयाची रक्कम कमी वाटत असली तरी देखील मात्र या पंधराशे रुपयांचा जर व्यवस्थित उपयोग केला किंवा चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली तर लाडक्या बहिणींना या माध्यमातून चांगला पैसा उपलब्ध होऊ शकतो. या अनुषंगाने आता या पैशांच्या गुंतवणुकीचे नियोजन कसे करायचे याबद्दलचे धडे आता सरकारच लाडक्या बहिणींना देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे लाडक्या बहिणीने या पैशांचे योग्य नियोजन कशा पद्धतीने करावे याकरिता महिला विकास विभागाच्या माध्यमातून एक कृती आराखडा तयार केला जात असून नक्कीच याचा फायदा लाडक्या बहिणींना होईल अशी शक्यता आहे. महिलांच्या आर्थिक दृष्टिकोनातून सक्षमीकरण व्हावे यासाठी सरकारचा हा प्रयोग नक्कीच फायद्याचा ठरेल.
नागपूरमध्ये करण्यात आला हा प्रयोग
नागपूर शहरामध्ये काही लाडक्या बहिणी एकत्र आल्या व त्यांनी छोटे व्यवसाय सुरू केले व हा प्रयोग त्या ठिकाणी यशस्वी ठरताना दिसला व त्यामुळे सरकारने आता महिला सक्षमीकरणाला बळ देण्याच्या उद्दिष्टाने या दिशेने पावले उचलायचे ठरवले असून काही महिला एकत्र येऊन दीड हजार रुपयातील हजार रुपये जमा करून एका महिलेला दरमहा व्यवसायासाठी मदत करत आहेत.
या प्रयोगामध्ये 50 ते 100 लाडक्या बहिणी एकत्र येऊन भिशीच्या माध्यमातून पन्नास हजार ते एक लाख रुपये जमा करीत आहेत या पैशातून प्रत्येक लाडक्या बहिणीचे छोटे उद्योग तसेच व्यवसाय उभे राहू लागले आहेत.
महिलांनी या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पंधराशे रुपयांचे योग्य नियोजन करून आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील व्हावे याकरिता महिला विकास विभागाने लाडक्या बहिणींना गावोगावी तसेच शहरी भागातही सरकारने दिलेल्या पैशाचे नियोजन शिकवून त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून साक्षर केले जाणार आहे व सध्या यावर कृती आराखडा तयार केला जात आहे.
अशा पद्धतीने आहे सरकारचे प्लॅनिंग
महिला आर्थिक साक्षर व्हाव्या व त्या दृष्टिकोनातून त्यांना शिक्षण मिळावे याकरिता दीड हजार रुपयांचे अंदाजपत्रक, त्याची बचत तसेच कर्ज आणि गुंतवणूक इत्यादी बाबी या माध्यमातून आता शिकवल्या जाणार आहेत. त्यामध्ये एक महिला तिचा पैसा वापरून व्यवसाय उभा करू शकत नाही.
परंतु अनेक महिला जर एकत्र आल्या तर व्यवसायाची साखळी तयार होऊ शकते व याकरिता आता सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. या सगळ्या कामांमध्ये सरकार महिला आर्थिक विकास महामंडळाची देखील मदत घेणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ हे बचत गटांचे आर्थिक नियोजन तसेच व्यवसाय वाढावा याकरिता काम करते.
या महामंडळाच्या माध्यमातून महिलांनी जर कर्ज घेतले व वेळेवर त्याची परतफेड केली तर जास्तीत जास्त स्वरूपात महामंडळाकडून महिलांना कर्ज मिळते.
या माध्यमातून जर महिलांनी कर्ज घेतले तर कर्जाची ही रक्कम मासिक हप्ता रूपात महामंडळाला देखील हक्काने मिळणार आहे. इतकेच नाही तर मिळणाऱ्या या दीड हजारातून काही रक्कम एसआयपी सारख्या नवीन गुंतवणूक योजनेत गुंतवता येईल का यावर देखील आता चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.