फेब्रुवारीच्या ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पीएम किसान योजनेचे पैसे! केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी सांगितली तारीख
Pm Kisan Yojana:- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी योजना असून या योजनेच्या माध्यमातून देशातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपयांचा लाभ तीन हप्त्यात विभागून दिला जातो. आतापर्यंत जवळपास केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 18 हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे
व हा अठरावा हप्ता वाशिम जिल्ह्यातून 5 ऑक्टोबर रोजी वितरित करण्यात आला होता. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना 19 वा हप्ता कधी येईल? याची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे व यासंबंधी आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून यासंबंधीची महत्त्वाची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.
24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा हप्ता
याबाबत सविस्तर वृत्त असे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ताचे वितरण 24 फेब्रुवारीला करणार असून या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये १९ हप्त्याचे वितरण करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती देशाचे कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे.
मागील 18 वा हप्ता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून 5 ऑक्टोबरला वितरित करण्यात आला होता व यावेळी 20 हजार कोटी रुपयांचा निधी देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांना मिळाला होता. जर आपण पीएम किसान योजनेचे स्वरूप बघितले तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा लाभ प्रत्येक वर्षाला या योजनेच्या माध्यमातून दिला जातो व त्यानुसार महिन्याला पाचशे रुपये शेतकऱ्यांना मिळतात.
या योजनेच्या पैशांचे वितरण वर्षातून तीन टप्प्यात केले जाते व प्रत्येक टप्प्यात दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँका खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जातात.
2019 मध्ये ही योजना सुरू झाली व तेव्हा पहिल्या हप्त्याचा जवळपास 3.40 कोटी शेतकऱ्यांना फायदा मिळाला होता व त्यानंतर आता अठरावा हप्त्याचा लाभ देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांना मिळाला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे गरजेचे
शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्याकरिता ई केवायसी पूर्ण करून घेणे खूप गरजेचे आहे. तसेच तुम्हाला जर तुमच्या पीएम किसान योजनेचे स्टेटस तपासायचे असेल तर या योजनेच्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन त्या ठिकाणी होम पेजवर असलेल्या फार्मर कॉर्नरवर क्लिक करावे.
त्यानंतर स्टेटस समजून घ्या वर क्लिक करावे व त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा. गेट ओटीपी वर क्लिक करून तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी टाकावा. त्यानंतर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या मिळालेल्या सगळ्या हप्त्यांचा तपशील पाहता येतो.
दरम्यान आता आगामी केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे व या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा निधी दहा हजार रुपये करण्यात यावा अशी देखील मागणी आता पुढे येत आहे. त्यामुळे या बाबतीत काय निर्णय घेतला जातो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.