लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता नाही मिळणार? जाणून घ्या यासंबंधी आलेली मोठी अपडेट
Majhi Ladki Bahin Yojana:- महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आणली गेलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही खूप महत्त्वपूर्ण ठरली व महायुतीला सत्तास्थानी बसवण्यासाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली असे देखील म्हटले गेले. परंतु जेव्हा विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता तेव्हा त्यामध्ये नमूद करण्यात आले होते की,
जर महायुतीची राज्यात सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपयेऐवजी 2100 रुपये करण्यात येईल. त्यामुळे आता या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळेल याची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. परंतु या पार्श्वभूमीवर याबद्दल एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे.
महिला व बाल विकास विभागाकडून राज्य सरकारकडे तसा प्रस्तावच गेला नसल्याची माहिती समोर
2100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळेल याची चर्चा सुरू असताना मात्र त्याबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे व ती म्हणजे यासंबंधीचा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे गेला
नसल्याची माहिती समोर आली आहे व याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी देखील दुजारा दिला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला २१०० रुपये मिळण्याची शक्यता तूर्तास जवळपास संपुष्टात आलेली आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते महत्त्वाचे विधान
काही दिवसांअगोदर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक महत्त्वाचे विधान केले होते व त्यांनी म्हटले होते की, लाडकी बहिण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता हा मार्च महिन्यानंतर दिला जाईल.
कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळतील असे त्यांनी म्हटले होते. अर्थसंकल्पातच यावर विचार केला जाण्याचे सुतोवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केले होते.
त्यामुळे राज्याच्या मार्च महिन्यात येऊ घातलेल्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे व त्यानंतरच महिलांना 2100 रुपये मिळतील की मिळणार नाहीत यामध्ये स्पष्टता येऊ शकते.
आतापर्यंत या योजनेतून महिलांना मिळाले 9000 रुपये
या योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये जुलै ते डिसेंबर असे सहा महिन्याचे पैसे आतापर्यंत जमा झालेले आहेत. प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये असे मिळून एकत्रित नऊ हजार रुपये महिलांच्या खात्यात आतापर्यंत जमा झाले असून जवळपास राज्यातील अडीच कोटी महिलांना या योजनेचा फायदा मिळाला आहे.
चार हजार महिलांनी स्वतःहून घेतली योजनेतून माघार
तसेच मध्यंतरीच्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या बाकी ज्या काही अटी आहे त्या अटींमध्ये ज्या महिला बसणार नाहीत अशांसाठी पडताळणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे व त्या आधीच राज्यभरातून चार हजारपेक्षा जास्त महिलांनी योजना नको असा अर्ज केला असून आपण या योजनेसाठी पात्र नाहीत असे लक्षात आल्याने काही महिला अर्ज भरून योजनेचा लाभ आता नाकारताना दिसून येत आहेत.