कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

तुमच्याही मोबाईलवर आला असेल ‘हा’ मेसेज तर नाही मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ! कुठे कराल तक्रार?

01:23 PM Jan 21, 2025 IST | Sonali Pachange
pm kisan yojana

Pm Kisan Yojana:- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे आणि केंद्र सरकारची महत्त्वाची आणि यशस्वी अशी एक योजना आहे. आपल्याला माहित आहे की,या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांचा लाभ हा दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यांमध्ये विभागून दिला जातो.

Advertisement

आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते केंद्र सरकारने वितरित केलेले आहेत व आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. परंतु आपल्याला माहित आहे की,मध्यंतरीच्या कालावधीमध्ये अनेक अपात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते व त्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून कडक पावले उचलण्यात आली व या योजनेच्या नियमांमध्येच बदल करण्यात आलेला होता.

Advertisement

आता 19 व्या हप्ता काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येईल. परंतु त्या अगोदर जरी तुम्हाला 18 हप्त्यांपर्यंत कुठलीही अडचण न येता लाभ मिळाला असेल तरीदेखील तुमच्या हप्त्याची अपडेट सह स्टेटस तपासत राहणे हे तुमच्यासाठी फायद्याचे राहील.

यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर तुमच्या मोबाईलवर काही मेसेज येत असेल तर समजून घ्या की, पीएम किसान योजनेच्या फायद्याच्या संदर्भात तुम्हाला काहीतरी अडचण आलेली आहे.

Advertisement

अपडेट स्टेटस कशी चेक कराल?
तुम्ही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेत असाल व ई केवायसी केली असेल आणि नवीन नियमानुसार आधार सिडिंग आणि जमिनीची सिडिंग पडताळणी पर्यंत सगळं काही केलं असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही.

Advertisement

परंतु तरीदेखील तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल व जेव्हा तुम्ही या वेबसाईटला भेट द्याल तेव्हा मेन पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करावे व त्यानंतर मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकावा.

याशिवाय असलेला कॅप्चा कोड टाकावा आणि सबमिट बटणावर क्लिक करावे. परंतु ही प्रक्रिया करताना लाभार्थी स्थिती तपासल्यानंतर जर शेतकऱ्याला NO असे लिहिलेले दिसले तर समजून घ्यावे की यावेळी पीएम किसान योजनेचा लाभ संबंधित शेतकऱ्याला मिळणार नाही.

अशावेळी काय कराल?
जर तुमच्या बेनिफिशरी स्टेटस अर्थात लाभार्थी स्थितीवर NO असे लिहिलेले दिसून आले तर तुमची ई केवायसी पडताळणी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करावा. तसेच जमीन आणि आधार कार्ड लिंक करण्याचे काम पूर्ण करावे.

परंतु यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मात्र तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभाग कार्यालयाला याबद्दलची माहिती द्यावी व अधिक माहितीसाठी तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 1555261 आणि 1800115526 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा 011-23381092 या नंबर वर कॉल करून याबाबतची तक्रार करून तुमची समस्या सोडवू शकतात.

Next Article