अपात्र लाडक्या बहिणींना 9 हजार रुपये परत करावे लागणार? ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार फक्त 500 रुपये?
Majhi Ladki Bahin Yojana:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक बाबतीत चर्चेत राहिली व ती प्रामुख्याने चर्चेत राहिली ती यासाठी की, झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला सत्तेच्या चाव्या देण्यामध्ये या योजनेची महत्त्वाची भूमिका राहिली असे म्हटले गेले.
विधानसभा निवडणुकांच्या कालावधीमध्ये जेव्हा महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला तेव्हा जर महायुतीचे सरकार आले तर लाडक्या बहिण योजनेतून पात्र लाभार्थ्यांना पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये देण्यात येतील. आता सत्तेवर महायुती सरकार आहे. परंतु जाहीरनाम्याप्रमाणे 2100 रुपये कधी मिळतील? हा मोठा प्रश्न आहेच.
परंतु त्या अगोदर सरकारने या योजनेच्या अर्जाची छाननी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे व यामध्ये ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना मिळणारा पंधराशे रुपयांचा लाभ बंद केला जाणार आहे.
परंतु ज्या महिला आता अपात्र ठरतील अशा महिलांच्या खात्यामध्ये अगोदरच या योजनेचे नऊ हजार रुपये जमा झालेले आहेत व जर आता या छाननीत या महिलांचे अर्ज जर बाद ठरले तर अशा लाभार्थ्यांना 9000 रुपये परत करावे लागणार की काय? हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून याबाबतीत स्पष्ट करण्यात आले आहे की, अशा प्रकारे सरकार देण्यात आलेले नऊ हजार रुपये परत घेणार नाही.
मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे महत्त्वाचे आवाहन
या योजनेच्या अनुषंगाने बघितले तर ज्या महिला लग्न करून राज्याच्या बाहेर गेल्या आहेत व दुसऱ्या राज्यात राहत आहेत. तसेच गेल्या पाच महिन्यांमध्ये ज्या महिलांना सरकारी नोकरी मिळाली आहे अशा सगळ्या महिलांची यादी आता या अर्ज पडताळणीमध्ये समोर येणार आहे.
इतकेच नाहीतर ज्या महिला अगोदर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना लाडकी बहिणी योजनेतून पूर्णपणे वगळणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे.
त्यामुळे अशा पद्धतीने चुकीची माहिती देऊन जर लाडक्या बहिणींनी लाभ घेतला असेल तर अशा लाडक्या बहिणींनी आता स्वतः पुढे येऊन अर्ज मागे घेण्याचे आवाहन आदिती तटकरे यांनी केली आहे.
या महिलांना मिळणार फक्त पाचशे रुपये
तसेच महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला जर दुसऱ्या इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही.
परंतु ज्या महिला नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना फक्त आता पाचशे रुपये मिळणार आहेत. यामागील प्रमुख कारण म्हणजे अशा महिलांना नमो शेतकरी सन्मान योजनेतून 1000 रुपये आधीच मिळतात व त्यामुळे अशा महिला लाभार्थ्यांना केवळ पाचशे रुपये मिळणार आहेत.