For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

संकटसमयी शेतकऱ्यांना 2 लाखाची मदत करते ‘ही’ योजना! कसा दाखल कराल दावा? जाणून घ्या एका क्लिकवर

02:27 PM Jan 24, 2025 IST | Sonali Pachange
संकटसमयी शेतकऱ्यांना 2 लाखाची मदत करते ‘ही’ योजना  कसा दाखल कराल दावा  जाणून घ्या एका क्लिकवर
farmer scheme
Advertisement

Shetkari Yojana:- शेतीमध्ये काम करत असताना बऱ्याचदा विविध प्रकारचे अपघात होत असतात व यामध्ये शेतकऱ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो व कधी कधी दुर्दैवाने शेतकऱ्यांचा मृत्यू देखील होतो. यामध्ये प्रामुख्याने शेतीमध्ये असताना एखादा होणारा अपघात किंवा वीज पडणे,पूर, सर्पदंश किंवा विजेचा शॉक बसणे इत्यादी आपत्तीमुळे अनेक प्रकारचे अपघात होतात व यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होऊ शकतो किंवा अपंगत्व येते.

Advertisement

परंतु जर अशा प्रकारची समस्या उद्भवली तर घरातील कर्त्या व्यक्तीवरच हा आघात नसतो तर त्याचा विपरीत परिणाम पूर्ण कुटुंबावर होतो. अशाप्रसंगी कमावता व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबाचे उत्पन्न बंद होते व मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते.

Advertisement

त्यामुळे अशा दुर्दैवी प्रसंगी अपघात ग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबांना दिलासा मिळावा व त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून मदत मिळावी याकरिता गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना खूप महत्त्वाची योजना आहे.

Advertisement

या योजनेच्या माध्यमातून विमा दावा कसा सादर करावा?

Advertisement

1- या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर अपघातग्रस्त शेतकरी किंवा सदरील शेतकऱ्याचे जे वारसदार असतात त्यांना आवश्यक त्या कागदपत्रांसह एक पूर्ण प्रस्ताव तयार करून तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तीस दिवसांच्या आत सादर करावा लागतो.

Advertisement

2- त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या विमा दाव्यांची तालुका कृषी अधिकारी यांना त्या प्रस्तावांची छाननी करावी लागते व जे विमा प्रस्ताव पात्र असतात ते संबंधित तहसीलदार यांच्याकडे सादर करावे लागते.

3- त्यानंतर तहसीलदार यांनी 30 दिवसांच्या आतमध्ये संबंधित शेतकरी / शेतकऱ्याचे वारसदारांना मदत देण्याबाबतचा निर्णय घेऊन संबंधित अपघातग्रस्त शेतकरी किंवा वारसास अनुदान देणे गरजेचे आहे व ते अनुदान त्यांना अदा करावे लागते.

4- तालुका समितीने याबाबत जो काही निर्णय घेतला आहे तो जर शेतकऱ्याला किंवा त्यांच्या वारसदाराला मान्य नसेल तर संबंधित शेतकरी किंवा वारसदार या विरोधात जिल्हास्तरावरील अपीलीय समितीकडे अपील सादर करू शकतात.

कशासाठी या योजनेचा लाभ नाही मिळत?
समजा यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याचा विमा कालावधीच्या आधीच मृत्यू किंवा अपंगत्व आले, शेतकरी आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न, शेतकऱ्याने जर जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेतले असेल तर, व्यक्ती मानसिकदृष्ट्या संतुलित नसेल किंवा अयोग्य असेल,

शेतकरी महिला असेल व बाळंतपणातील तिचा मृत्यू किंवा शरीरांतर्गत रक्तस्राव, शेतकरी सरकारी नोकरीत असेल तर अशावेळी या गोष्टींमध्ये मात्र या योजनेच्या माध्यमातून दिला जाणारा विमा नाकारला जातो. म्हणजे अशा घटनांमध्ये या योजनेचा लाभ मिळत नाहीत.