कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

Pune News : पुण्यात दूध महागले! 15 मार्चपासून लागू होणार नवीन दर… शेतकऱ्यांना काय मिळणार?

06:24 PM Mar 15, 2025 IST | Krushi Marathi

Pune News :- राज्यात गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात सातत्याने घट होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दूध दर वाढीची प्रतिक्षा होती. अशा परिस्थितीत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज डेअरीमध्ये शुक्रवारी (ता. १४) झालेल्या बैठकीत दुधाच्या विक्री दरात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय १५ मार्चपासून लागू होणार असून, गायीच्या दुधाचा दर ५८ रुपये प्रतिलिटर तर म्हशीच्या दुधाचा दर ७४ रुपये प्रतिलिटरपर्यंत जाणार आहे. या बैठकीस विविध सहकारी आणि खासगी दूध संस्थांचे ४७ प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement

दूध दरवाढ करण्यामागील कारणे

दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले की, महागाईच्या पार्श्वभूमीवर आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून दरवाढ करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. याशिवाय, पनीरमधील भेसळ रोखण्यासाठी जनजागृती करण्यावरही चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान लवकर मिळावे यासाठी शासनाकडे मागणी केली जाणार असून, अन्न व औषध प्रशासन मंत्री, अधिकारी आणि दुग्धविकास मंत्री यांची भेट घेऊन भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाईल, असे कुतवळ यांनी स्पष्ट केले.

Advertisement

यासोबतच पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्याचे ठरवले आहे. दुग्ध विभागासह अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मंत्र्यांनाही या संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीपाद चितळे यांनी दिली.

बैठकीत राज्यभरात दुधाचे सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळा संकलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना गुणवत्तापूर्ण दूध मिळण्याची हमी मिळेल, असे कात्रज दूध संघाचे अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे यांनी सांगितले. तसेच, राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेअंतर्गत मागील ३ ते ४ महिन्यांचे प्रति लिटर ५ रुपये अनुदान प्रलंबित आहे. हे अनुदान लवकर मिळावे यासाठीही बैठकीत मागणी करण्यात आली. दूध विक्री दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, मात्र खरेदी दरात वाढ होत नसल्यामुळे त्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

Advertisement

Advertisement
Tags :
pune news
Next Article