कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

Pm Kisan Yojana : 18 वा हफ्ता मिळून 100 दिवस झालेत, 19वा हफ्ता कधी मिळणार ? समोर आली मोठी अपडेट

10:02 PM Jan 14, 2025 IST | Sonali Pachange
Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : मंडळी, तुम्ही पीएम किसानचा लाभ घेता का हो ? मग थांबा अन आजचा हा लेख शेवटपर्यंत वाचा, आजचा हा लेख तुमच्याच कामाचा आहे. पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे, ते म्हणजे पीएम किसानच्या पुढील हफ्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना 3 महत्वाच्या गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. जर शेतकऱ्यांनी आम्ही सांगतोय त्या गोष्टींची पूर्तता केली नाही तर त्यांना पुढील हप्त्यापासून वंचित रहावे लागू शकते.

Advertisement

खरेतर, पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना. याची सुरुवात 2019 मध्ये झाली आणि तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे. या अंतर्गत एका आर्थिक वर्षात सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो, पण हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते. म्हणजे एका आर्थिक वर्षात पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचे तीन हप्ते दिले जात आहेत.

Advertisement

या योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता प्रत्येक चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून आतापर्यंत या योजनेचे एकूण 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागलीये. अशा परिस्थितीत आज आपण या लेखात पीएम किसान योजनेचा पुढील 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार ? याचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी काय करणे आवश्यक आहे ? याचीच सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मंडळी, जे शेतकरी या योजनेचा अगदी सुरुवातीपासून लाभ घेत आहेत त्यांना आत्तापर्यंत एकूण 36 हजार रुपयांचा लाभ मिळालाय. या योजनेचे एकूण 18 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत आणि लवकरच 19 वा हप्ता मिळणार आहे. या योजनेचा अठरावा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

Advertisement

5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता देशभरातील जवळपास साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालाय. म्हणजेच मागील अठरावा हप्ता जमा होऊन आता जवळपास साडेतीन महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे, यामुळे शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.

Advertisement

मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर या योजनेचा पुढील हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. अठरावा हप्ता जमा होऊन आता जवळपास साडेतीन महिन्याचा काळ पूर्ण झाला आहे आणि यामुळे फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा पुढील हफ्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल असे म्हटले जात आहे.

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा 19 वा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करणार आहेत. पण, याबाबतची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही, पीएम किसानच्या वेबसाईटवर अजून याबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, केंद्रातील मोदी सरकारकडून जेव्हा 19वा हप्ता वितरित करण्याचा निर्णय होईल त्यानंतर पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत संकेतस्थळावर याची माहिती अपडेट केली जाणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची वेबसाईट वेळोवेळी चेक करत राहिले पाहिजे. दरम्यान शेतकऱ्यांना पीएम किसानचा 19 वा हप्ता हवा असेल तर त्यांना 3 महत्वाच्या गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत.

जर केवायसीची प्रक्रिया केली नाही तर कदाचित अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेच्या शेतकऱ्यांना जमिनीच्या नोंदींची पडताळणी सुद्धा करावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी जमीन पडताळणी केली नाही त्यांनाही याचा लाभ मिळणार नाही. म्हणून जर तुमचं जमीन पडताळणीचं काम बाकी असेल तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कृषी विभागातील सरकारी अधिकारी देशभरातील शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदींची पडताळणी लवकरात लवकर करावी यासाठी सातत्याने आवाहन करत आहे.

यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनजागृतीचे काम हाती घेत विशेष मोहीम सुद्धा राबवली आहे. याशिवाय या योजनेचा पुढील हफ्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी तिसरी महत्वाची गोष्ट करणे आवश्यक आहे ती म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यासोबत आधार क्रमांक लिंक करणे गरजेचे आहे. जे शेतकरी आपल्या बँक खात्यासोबत आधार क्रमांक लिंक करणार नाहीत त्यांच्या खात्यात या योजनेचा पैसा जमा होऊ शकत नाही. म्हणून हे सुद्धा काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्या.

Tags :
PM Kisan Yojana
Next Article