For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

Pm किसानचा लाभ नवरा अन बायको दोघांनाही मिळतो का ? नियम काय सांगतात ?

01:50 PM Nov 03, 2024 IST | Krushi Marathi
pm किसानचा लाभ नवरा अन बायको दोघांनाही मिळतो का   नियम काय सांगतात
Pm Kisan Yojana Rules
Advertisement

Pm Kisan Yojana Rules : पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत.

Advertisement

मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे दिले जात आहेत. आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना 18 हफ्ते देण्यात आले आहेत.

Advertisement

प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा हफ्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. पीएम किसान चा मागील 18 वा हप्ता गेल्या ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला असून या योजनेचा पुढील हप्ता हा आता फेब्रुवारी 2025 मध्ये पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

Advertisement

खरे तर ही योजना सुरू होऊन पाच वर्षांपेक्षा अधिकचा काळ झाला आहे. पण मात्र आजही या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये काही प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेकांच्या माध्यमातून पीएम किसान चा लाभ नवरा आणि बायको दोघांनाही मिळतो का असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.

Advertisement

खरे तर अनेक शेतकरी पती-पत्नी दोघांच्याही नावावर शेत जमीन असते. त्यामुळे शेत जमीन नावावर असल्याने नवरा आणि बायको दोघांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो का? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

Advertisement

पण, पी एम किसान च्या नियमानुसार किसान सम्मान निधि योजना ही शेतकरी कुटुंबासाठी आहे. नवरा बायको आणि अठरा वर्षाखालील आपत्य असणाऱ्या शेतकरी कुटुंबाला याचा लाभ मिळतो. म्हणजे कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरतो. म्हणजे कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला याचे पैसे मिळतात.

त्यामुळे एकाच कुटुंबातील पती-पत्नी दोघांना देखील या योजनेचा लाभ मिळणे शक्य नाही. दोघांपैकी एकाच व्यक्तीला याचा लाभ घेता येतो. तसेच, एकाच कुटुंबात राहणारे २ भाऊ सुद्धा याचा लाभ घेऊ शकत नाहीत. पण, जर दोन्ही भाऊ वेगवेगळ्या घरात राहत असतील आणि त्यांची शेती सुद्धा वेगवेगळी असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Tags :