For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

Pm Kisan चे 2 हजार खात्यात आलेत पण नमो शेतकरीचा हफ्ता कधी ? समोर आली नवी अपडेट

02:31 PM Mar 10, 2025 IST | Krushi Marathi Office
pm kisan चे 2 हजार खात्यात आलेत पण नमो शेतकरीचा हफ्ता कधी   समोर आली नवी अपडेट
Pm Kisan Yojana
Advertisement

केंद्रातील मोदी सरकारकडून 2019 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली, ही योजना पूर्णपणे केंद्रीय पुरस्कृत असून या अंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जात आहेत. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने पैसे मिळतात. अर्थात या योजनेतून एका आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना तीन हप्ते मिळतात.

Advertisement

आत्तापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे एकूण 19 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. याचा 19 वा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना मिळाला आहे. पीएम किसानचा 19 वा हफ्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला असून आता या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरता आहे.

Advertisement

दरम्यान, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत नुकतीच एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. अशा परिस्थितीत, आज आपण नमो शेतकरीचा पुढील सहावा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, शासन दरबारी नमो शेतकरी च्या पुढील हत्याबाबत काय हालचाली सुरू आहेत? याच मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार मी…. आणि तुम्ही पाहत आहात कृषी मराठी हे आमचं नवं यूट्यूब चैनल.

Advertisement

मित्रांनो, तारीख 24 फेब्रुवारी 2025 पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. खरेतर, 24 तारखेलाच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल असे वाटत होते. कारण असे की पीएम किसानचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरीचा पाचवा हप्ता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

Advertisement

वाशिम येथून गेल्या वर्षी या दोन्ही योजनांचा लाभ सोबतच शेतकऱ्यांना मिळाला. यामुळे बिहार राज्यातील भागलपूर येथून सुद्धा शेतकऱ्यांना पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा लाभ सोबतच दिला जाऊ शकतो अशी चर्चा होती. अनेक ठिकाणी या दोन्ही योजनांचा लाभ यावेळी देखील सोबतच मिळणार असे वृत्त झळकले होते. मात्र 24 फेब्रुवारीला फक्त पीएम किसानचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नमो शेतकरीचा लाभ मिळाला नाही.

Advertisement

दुसरीकडे, आता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होऊन जवळपास 17 दिवसांचा काळ उलटला आहे. यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील जवळपास 91 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. यापूर्वी पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा हफ्ता एकत्रच मिळाला होता. त्यामुळे आता नमो शेतकरीचा हप्ता उशिरा मिळण्याचे कारण काय असाही प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होतोय.

पण शेतकरी मित्रांनो काळजी करू नका कारण पीएम किसान नंतर आता नमो शेतकरीचा हप्ता देखील लवकरच खात्यात येण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. मंडळी, राज्यात सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि 10 मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी विविध घोषणासह नमो सन्मान शेतकरी योजनेचा हफ्त्याची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

खरतर, नमो किसानचा हप्ता एक किंवा दोन मार्चला शेतकऱ्यांच्या खात्यात येईल असा दावा करण्यात आला होता. मात्र 10 मार्च उलटल्यानंतरही नमो शेतकरीचा हप्ता अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही. पण, लवकरच याबाबतचा निर्णय होणार आहे. नमो शेतकरीचा हप्ता मार्च अखेरपर्यंत पात्र शेतकऱ्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे, आता नमो शेतकरीचा हप्ता मार्च अखेरपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पण मंडळी तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्र राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरीचा पुढील हप्ता कधीपर्यंत खात्यात येऊ शकतो? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार.

Tags :