For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

पीएम किसान योजनेच्या नियमात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल ! आता ‘हे’ एक डॉक्युमेंट असेल तेव्हाच योजनेचा लाभ मिळणार

12:50 PM Jan 11, 2025 IST | Krushi Marathi
पीएम किसान योजनेच्या नियमात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल   आता ‘हे’ एक डॉक्युमेंट असेल तेव्हाच योजनेचा लाभ मिळणार
Pm Kisan Yojana
Advertisement

Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना असून या योजनेच्या नियमांमध्ये नुकताच एक मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी द्यावा लागणार आहे. या योजनेसाठी जे शेतकरी बांधव नव्याने नोंदणी करतील त्यांना फार्मर आयडी कंपल्सरी करण्यात आला आहे.

Advertisement

फार्मर आयडी नसेल तर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार नाही. मंडळी, देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व राज्यांमध्ये शेतकरी नोंदणी केली जात आहे, म्हणजेच शेतकऱ्यांची युनिक फार्म आयडी तयार केली जात आहे, जेणेकरून सरकारला शेतकऱ्यांची माहिती मिळेल.

Advertisement

दरम्यान, आता केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजनेच्या नवीन अर्जदारांसाठी शेतकरी नोंदणी अनिवार्य केली आहे. पूर्वी, योजनेचे फायदे मिळविण्यासाठी ई-केवायसी (e kyc) पुरेसे होते, पण आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी सुद्धा द्यावी लागणार आहे. तथापि, जुन्या शेतकऱ्यांना यासाठी वेळ दिला जात आहे.

Advertisement

परंतु नवीन शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आली आहे. कृषी मंत्रालयाने पीएम किसानसह इतर कृषी योजनांसाठी शेतकरी नोंदणी म्हणजे फार्मर आयडी अनिवार्य केली आहे आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हे काम पूर्ण करण्यास सांगितले आहे.

Advertisement

ज्यांच्या नावावर शेतीची जमीन नोंदणीकृत आहे, त्यांनाच या योजनेचे फायदे मिळावेत, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. १ जानेवारी २०२५ पासून, राज्यांनी जमिनीच्या नोंदींचे ओळखपत्र तयार करणे आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्यांची माहिती सहज उपलब्ध होईल.

Advertisement

दरम्यान, शेतकऱ्याला दिलेला हा युनिक आयडी अर्जदाराकडे शेतीयोग्य जमीन असल्याची हमी देईल आणि यामुळे पीएम-किसानची नोंदणी प्रक्रिया सुद्धा सुलभ होईल. पी एम किसान योजनेबाबत बोलायचं झालं तर ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. या अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात.

मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत. दोन हजार रुपयांचा एक हफ्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण 18 हप्ते देण्यात आले आहेत. म्हणजेच जो शेतकरी या योजनेचा पहिल्या हप्त्यापासून लाभ घेत आहे त्याला आत्तापर्यंत एकूण 36 हजार रुपये मिळाले आहेत.

या योजनेचा मागील 18 वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता या योजनेचा पुढील 19वा हफ्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो यानुसार या योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा होईल अशी माहिती समोर येत आहे.

Tags :