पीएम किसानचा १९ वा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार ! समोर आली मोठी अपडेट
Pm Kisan Yojana News : केंद्रातील सरकारने सुरु केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील 19 वा हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.
दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण होते आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 18 हप्ते देण्यात आले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा पुढील 19 वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो या संदर्भातही एक नवीन अपडेट समोर आली आहे.
कधीपर्यंत जमा होणार पीएम किसान चा १९ वा हफ्ता
5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम येथे आयोजित एका शेतकरी कार्यक्रमातून पीएम किसानचा 18 वा हप्ता पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. यामुळे आता शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरता लागलेली आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक चार महिन्यांनी नवीन हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. त्यानुसार पाहिलं तर या योजनेचा पुढील हप्ता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतानाच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात पीएम किसानचा 19 वा वा हप्ता पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात केंद्रातील सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
त्यामुळे या योजनेचा पुढील हप्ता नेमका कधी जमा होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. दुसरीकडे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याची देखील मागणी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकार या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसानची रक्कम 6 हजारावरून बारा हजार रुपये केली जाणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय अर्थसंकल्पात घेतला जाऊ शकतो असा सुद्धा दावा करण्यात आला आहे.
यामुळे आता केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच पीएम किसान योजनेबाबत अधिकची स्पष्टता येऊ शकणार आहे. अर्थातच पुढील हप्ता हा 2000 रुपयाचा मिळणार की यामध्ये वाढ होणार हे अर्थसंकल्पानंतरच क्लियर होणार आहे.