शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या ‘या’ नियमात पुन्हा बदल, वाचा सविस्तर
Pm Kisan Yojana News : केंद्रातील सरकारने 2019 मध्ये देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. याचं योजनेची वाढती लोकप्रियता पाहता नुकत्याच काही महिन्यांपूर्वी शिंदे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्माननिधी योजना सुरू केली आहे.
पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे पैसे दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे वितरित केले जातात. एका वर्षात या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हजाराचे तीन हप्ते मिळतात.
दरम्यान याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली असून या अंतर्गत देखील पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान चे 6000 आणि नमो शेतकरीचे 6000 असे एकूण 12,000 रुपये मिळत आहेत.
दरम्यान जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि अतिशय कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा मोठा निर्णय घेतलाय.
अशा परिस्थितीत आज आपण सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये नेमका कोणता बदल केला आहे याबाबत अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
योजनेच्या नियमांमध्ये काय बदल झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा योजनेचा लाभ हा एकाच कुटुंबातील पती - पत्नी या पैकी एका व्यक्तीला किंवा 18 वर्ष वय पूर्ण असलेल्या मुलांना लाभ घेता येतो. उताऱ्यावर 2019 पूर्वी जमीन खरेदी केल्याची नोंद असेल किंवा वारसा हक्काने जमीन नावावर झाली असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
योजनेचा अर्ज करण्यासाठी पती, पत्नी आणि मुलांचे आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
सरकारी अथवा निमसरकारी नोकरी असलेल्या किंवा टॅक्स भरणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
आता ही कागदपत्रे सादर करावी लागणार?
लाभार्थी शेतकऱ्यांच्या पती पत्नीचे आधार कार्ड अनिवार्य असणार आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांचा फेरफार तसेच विहीत नमुना अर्ज गरजेचा असणार आहे.
लाभार्थी शेतकऱ्याला नवीन 7/ 12 आणि 8 (अ) उतारा अनिवार्य असणार आहे.
शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड सुद्धा लागणार आहे.