Pm Kisan च्या वेबसाईटमध्ये बदल, आता ‘ही’ एक चूक केलेली असेल तर कधीच मिळणार नाहीत पीएम किसानचे 6 हजार रुपये !
Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची बातमी विशेष खास ठरणार आहे. ही योजना एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. या योजनेसाठी आवश्यक असणारा सर्व खर्च केंद्रातील सरकारकडून केला जात आहे. याचा लाभ देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना होतोय. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.
एका आर्थिक वर्षात दिले जाणारे हे पैसे एकाच वेळी मिळत नाहीत. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना हे पैसे दिले जात आहेत. या योजनेचा लाभ प्रत्येक चार महिन्यांनी मिळतो.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना एकूण 18 हफ्ते देण्यात आले आहेत. अठरावा हफ्ता हा ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. 5 ऑक्टोबर 2024 ला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून आता शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील 19 वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याबाबत अजून केंद्रातील सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही पण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता जमा होतो यानुसार याचा पुढील हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर एक मोठा बदल झाला आहे. आता या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर Voluntary Surrender हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. खरंतर या योजनेचा देशातील अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळतोय. मात्र या योजनेचा काही शेतकऱ्यांना लाभ मिळतं नाहीये.
गेल्या काही हप्त्यांपासून शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळत नाहीयेत. दरम्यान आता याचेच एक मोठे कारण समोर आले आहे. Voluntary Surrender हा पर्याय स्वीकारल्यामुळे काही शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.
मंडळी पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर वोलेन्ट्री सरेंडर हा ऑप्शन आला असून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा ऑप्शन चुकून सिलेक्ट केला गेला आहे. हेच कारण आहे की या शेतकऱ्यांना पीएम किसानचं लाभ मिळत नाहीये.
महत्त्वाची बाब म्हणजे हा पर्याय स्वीकारल्यानंतर पीएम किसान च्या लाभार्थ्यांना कधीच या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. यामुळे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि त्यांना या योजनेच्या लाभाची गरज नाही त्यांनीच हा ऑप्शन सिलेक्ट केला पाहिजे.
ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान चा लाभ हवा असेल आणि ते पात्र असतील तर त्यांनी हा ऑप्शन सिलेक्ट करू नये. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर पी एम किसान चा लाभ बंद होतो आणि भविष्यात कधीच याचा लाभ मिळू शकत नाही.