कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट! मोबाईल नंबर बंद असेल तर योजनेचा 19 वा हप्ता मिळणार नाही; नवीन नंबर कसा अपडेट करायचा?

12:10 PM Dec 26, 2024 IST | Krushi Marathi
Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : पीएम किसान योजना ही केंद्रातील सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून याच योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. जर तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्र पुरस्कृत योजना. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.

Advertisement

एका आर्थिक वर्षात दिली जाणारी ही रक्कम एकाच वेळी मिळत नाही, तर दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने एका आर्थिक वर्षात तीन हप्ते पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. आत्तापर्यंत, पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 18 हप्ते मिळालेले आहेत.

Advertisement

महाराष्ट्रातही लाखो शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. जो शेतकरी या योजनेचा अगदी पहिल्या हप्त्यापासून लाभ घेत आहे त्याला आत्तापर्यंत 36 हजार रुपये मिळालेले आहेत. दरम्यान, या योजनेचा 19 वा हप्ता देखील लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, नव्या वर्षात या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. 18 वा हफ्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

Advertisement

मात्र, हा हप्ता ज्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर बंद असेल त्यांना मिळणार नसल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे जर तुमचाही मोबाईल नंबर बंद असेल तर तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नवीन नंबर अपडेट करावा लागणार आहे.

Advertisement

कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसानचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे सक्रिय मोबाईल नंबर पाहिजे. हा क्रमांक शेतकऱ्यांच्या आधारकार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे.

जेव्हा मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक एकमेकांशी जोडला जाईल तेव्हाच शेतकरी यां योजनेसाठी ई-केवायसी करू शकतील. ई केवायसी ओटीपी आधारित आहे. म्हणजेच केवायसी तेव्हाच होईल जेव्हा मोबाईल नंबरवर OTP येईल. यामुळे ज्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर बंद असेल त्यांनी आपला मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक आहे.

मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी प्रथम पीएम किसानच्या https://pmkisan.gov.in/ वेबसाइटवर जा. 'अपडेट मोबाइल नंबर' पर्यायावर क्लिक करा. नोंदणी किंवा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा. सर्च ऑप्शनवर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर टाकून अपडेट करा. अशा तऱ्हेने शेतकऱ्यांना आपला मोबाईल नंबर अपडेट करता येणार आहे.

Tags :
19th InstallmentGovernment Scheme NewsPM Kisan YojanaPM Kisan Yojana 19th InstallmentSarkari Yojanaschemeyojana
Next Article