पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतकरी कुटुंबातील किती शेतकऱ्यांना मिळणार? सरकारने अखेर स्पष्टचं सांगितलं
Pm Kisan Sanman Nidhi Yojana : केंद्रातील मोदी सरकारने 2014 मध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर देशातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्यात. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी केंद्रातील मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. 2019 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचा लाभ दिला जातोय.
मात्र हे 6000 रुपये शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 18 हफ्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असून पुढील 19 वा हप्ता देखील लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल अशी माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे. या योजनेचा पुढील 19 वा हप्ता हा फेब्रुवारी 2025 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल असे काही जाणकारांनी स्पष्ट केले आहे.
खरे तर ही योजना सुरू होऊन आता पाच वर्षांपेक्षा अधिकचा काळ पूर्ण झाला आहे. मात्र आजही या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये असंख्य प्रश्न आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा लाभ एका कुटुंबातील किती शेतकरी घेऊ शकतात असाही प्रश्न शेतकऱ्यांकडून सातत्याने उपस्थित केला जातोय.
दरम्यान आता केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांच्या मनातील हीच शंका दूर केली असून सरकारच्या माध्यमातून या योजनेची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सरकारने जाहीर केलेल्या या नव्या नियमावलीनुसार, वारसा हक्क वगळता २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली असेल तरी त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
आता पीएम किसानसाठी नाव नोंदणी करताना पती-पत्नी व मुलांचे आधार कार्डसोबत जोडावे लागणार असून कुटुंबातील एकालाच लाभ मिळणार आहे. अर्थातच शेतकरी कुटुंबातील फक्त एकच सदस्य या योजनेसाठी पात्र राहील. या योजनेत शेतकरी म्हणून एकाच कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एका व्यक्तीला किंवा अठरा वर्षांवरील मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सातबारा उताऱ्यावर २०१९ पूर्वीची नोंद असेल किंवा वारसा हक्काने नाव नोंद असेल तर या योजनेचा लाभ मिळणार आहे. खरे तर ही योजना गरजवंत शेतकऱ्यांना डोळ्यापुढे ठेवून सुरू करण्यात आली. मात्र या योजनेचा अनेक शेतकऱ्यांकडून अपात्र असताना सुद्धा लाभ घेतला जात असल्याचे अनेक प्रकरणातून समोर आले.
अनेक ठिकाणी याचा लाभ घेण्यासाठी पती-पत्नी व मुलगा तसेच २०१९ नंतर जमीन नावावर झालेले किंवा माहेरवाशिणीकडून जमीन आपल्या नावावर असल्याचे दाखवून दोन्हींकडून लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. हेच कारण आहे की आता सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. केंद्रातील मोदी सरकारने आता या योजनेत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना आणि गरजू शेतकऱ्यांनाच मिळेल असा दावा देखील सरकारकडून होतोय. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार असून या योजनेत नोंदणी करताना पती-पत्नी व मुलांचे आधारकार्ड सोबत जोडावे लागणार आहे.