शेतकऱ्यांसाठी Good News ! बजेटमध्ये कृषी क्षेत्राला बूस्टर डोस मिळणार, शेतकऱ्यांना मिळणार ‘हा’ आर्थिक लाभ
Pm Kisan News : नव्या वर्षात शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार अन त्यांचा सन्मान वाढवला जाणार अशी शक्यता आहे. मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाचं पूर्ण अर्थसंकल्प करणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 ला सादर होणार आहे. यात विविध घटकांसाठी निर्णय घेतल्या जाणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी सुद्धा आगामी अर्थसंकल्पात मोठा निर्णय होणार अशी शक्यता आहे अन त्यासाठीची जोरदार तयारी सुद्धा सुरू करण्यात आली आहे. येत्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण पीएम किसान सन्मान निधी योजनेला बुस्टर डोस देण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे.
पीएम किसान योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. 2 हजाराचा एक हप्ता या पद्धतीने पैशांचे वितरण केले जाते. प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्याचं जमा होतो. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांचा खात्यात 18 हफ्ते जमा करण्यात आले आहेत.
याचा 18वा हफ्ता हा 5 ऑक्टोबर 2024 ला जमा करण्यात आला होता. आता या योजनेच्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. या योजनेचा 19 वा हफ्ता हा फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो असं बोललं जात आहे.
सरकारकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र या योजनेचा पैसा प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने याचा पुढील हफ्ता फेब्रुवारी महिन्यात जमा केला जाईल असा दावा केला जात आहे. नक्कीच फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली तर शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरेल.
पण त्याआधीच या योजनेच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या योजनेअंतर्गत सध्या वार्षिक सहा हजार रुपये असलेली रक्कम आठ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत कशी वाढविता येईल यासाठीची अर्थमंत्रालयाच्या पातळीवर चाचपणी सुरू असल्याचे कळते.
पीएम किसान सन्मान निधी योजनेतील अर्थसाहाय्याची रक्कम वाढविण्याचा तूर्तास कोणताही प्रस्ताव नसल्याचे मोदी सरकारने संसदेतील प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले आहे. पण पंजाब आणि हरियानामधील शेतकरी संघटनांकडून एमएसपीच्या कायदेशीर हमीसाठी सुरू झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी उपाययोजनेची गरज सरकारी पातळीवरून व्यक्त करण्यात येत आहे.
किसान सन्मान निधी कसा वाढविता येईल याबाबत सध्या अर्थ मंत्र्यालयात प्राथमिक स्वरूपाची चर्चा सुरू आहे. त्यासाठी कृषी खात्याची अर्थसंकल्पातील तरतूद कशा प्रकारे वाढविली जाऊ शकते याचाही गांर्भायाने विचार करावा लागणार आहे अन त्या दृष्टीने सध्या काम होताना दिसते.
किसान सन्मान निधीचे सध्या १०.३२ कोटी लाभार्थी असून त्यांच्या आर्थिक मदतीसाठी ६० हजार कोटी रुपये यंदाच्या आर्थिक वर्षात खर्च होणार आहेत. पण पी एम किसान सन्माननीय योजनेची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला तर अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठीची निधीची तरतूद देखील दुपटीने वाढवावी लागणार आहे. यामुळे आता याबाबत अर्थसंकल्पात नेमका काय निर्णय होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.