कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

पीएम आवास योजनेबाबत मोठी अपडेट! आता ‘या’ पोर्टलवर जाऊन अर्ज भरता येणार, किती अनुदान मिळणार ?

06:24 PM Nov 16, 2024 IST | Krushi Marathi
PM Awas Yojana

PM Awas Yojana : पीएम आवास योजनेबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. खरे तर ही योजना 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही केंद्रीय योजना संपूर्ण देशभरात लागू असून या अंतर्गत आत्तापर्यंत कोट्यावधी लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

Advertisement

या योजनेतून घर बांधण्यासाठी अन खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. घरासाठी घेतलेल्या होम लोन वर आकारल्या जाणाऱ्या व्याजेसाठी सुद्धा सवलत दिली जाते. दरम्यान आता याच योजनेबाबत केंद्रातील सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीएम आवास योजनेसाठी आता नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून यासाठी सरकारकडून एक पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

सरकारने नुकतीच प्रधानमंत्री आवास योजनेची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे. या अंतर्गत शहरी भागात पुढील पाच वर्षामध्ये कोट्यावधी नागरिकांना घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी सरकारने कर्ज देणाऱ्या बँका आणि संस्थांसोबत करार केले आहेत.

Advertisement

या योजनेअंतर्गत नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. पीएम आवास योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत 1.80 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसोबतच मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरिकांना देखील या योजनेचा लाभ मिळतो.

Advertisement

आत्तापर्यंत कोट्यावधी कुटुंबाचे घर खरेदीचे स्वप्न या योजनेमुळे पूर्ण झाले असून नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध झाले असल्याने नागरिकांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळतय. दरम्यान आता सरकारने या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या नागरिकांसाठी एक नवीन पोर्टल सुरू केले आहे.

गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाने हे नवे पोर्टल तयार केले असून या पोर्टल वर जाऊन आता पात्र नागरिकांना आपला अर्ज सादर करता येणार आहे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आता या पोर्टल वर जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या पोर्टलमुळे या योजनेची अर्ज प्रक्रिया आणखी सोपी होईल असा विश्वास संबंधितांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब अशी की या पोर्टलमुळे आता अर्जदारांना त्यांच्या अर्जाची स्थिती कळू शकणार आहे.

या योजनेत अंमलबजावणीत सहभागी असलेले सर्वजण आपला डेटा शेअर करु शकणार आहेत. या योजनेच्या अंबलबजावणीची प्रक्रिया जास्त वेगवान होणार आहे. याचसोबत केंद्रिय स्तरावरदेखील देखरेख ठेनवली जाणार आहे.

नक्कीच केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया या पोर्टलमुळे सोपी होणार असल्याने या योजनेला आणखी गती मिळेल असे बोलले जात आहे.

Tags :
Pm Awas Yojana
Next Article