For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

पीएम आवास योजना : नवीन घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, कसा करणार अर्ज? वाचा….

06:40 PM Dec 17, 2024 IST | Krushi Marathi
पीएम आवास योजना   नवीन घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु  कसा करणार अर्ज  वाचा…
Pm Awas Yojana
Advertisement

Pm Awas Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध कौतुकास्पद योजना राबवल्या जात आहेत. ज्या लोकांकडे पक्के घर नाही, कच्च्या घरात राहतात किंवा त्यांच्याकडे स्वतःचे घर नाही आणि भाड्याच्या घरात राहतात अशा लोकांसाठी देखील अनेक घरकुल योजना शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्या आहेत.

Advertisement

महाराष्ट्र राज्य सरकारने शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, नमो आवास योजना अशा काही घरकुल योजना बेघर लोकांसाठी सुरू केल्या आहेत. यासोबतच केंद्रातील सरकारने देखील बेघर लोकांसाठी पीएम आवास योजना ही घरकुल योजना सुरु केली आहे.

Advertisement

पीएम आवास योजना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागासाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र लोकांना घर बांधण्यासाठी मदत केली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि मध्यमवर्गीय लोकांना लाभ दिला जात आहे.

Advertisement

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्रीय मंत्रिमंडळाने 9 ऑगस्ट 2024 रोजी PMAY 2.0 ला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत आता 1 कोटी नवीन घरे बांधले जाणार आहेत. भारत सरकारचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता या योजनेकरिता अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या मते नवीन घर बांधण्यासाठी 2.30 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

Advertisement

या योजनेच्या माध्यमातून शहरी भागातील नागरिकांना घर बांधण्यासाठी दोन लाख तीस हजार रुपयांच्या अनुदान दिले जाणार असून या योजनेचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. आता आपण या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कसा करायचा या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

Advertisement

अर्ज कसा करायचा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. पीएम आवास योजना शहरीमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम PMAY-Urban वेबसाइटवर लॉग इन करा. त्यानंतर PMAY-U 2.0 साठी नोंदणी फॉर्मवर क्लिक करा आणि नंतर सर्व आवश्यक माहिती वाचा.

आपण या सर्व गोष्टी वाचल्यानंतर आपले वार्षिक उत्पन्न आणि सर्व आवश्यक कागदपत्रे तपासा, जसे की आधार तपशील तपासा, त्यानंतर आपण नोंदणी फॉर्ममध्ये आपले नाव, पत्ता, उत्पन्न तपशील आणि इतर सर्व माहिती अपडेट करा, त्यानंतर आपण नोंदणी फॉर्म सबमिट करा आणि अर्जाच्या स्थितीची माहिती मिळेपर्यंत प्रतीक्षा करा.

कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागणार?

अर्जदाराचा आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, निवास प्रमाणपत्र, ओळखपत्र (पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार आयडी), पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक डिटेल्स इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

Tags :