मंजूर झालेला पिक विमा खात्यात पडत नसेल तर ‘या’ ठिकाणी तक्रार दाखल करा ! लगेचच मिळणार विम्याचे पैसे
Pik Vima Yojana : शेतकऱ्यांसाठी केंद्रातील सरकारने पिक विमा योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने केंद्राच्या या पिक विमा योजनेची व्याप्ती वाढवत शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पिक विमा उपलब्ध करून दिला आहे.
म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून पिकाचा विमा काढता येतो. पिक विमा साठी शेतकरी हिश्याची बाकीची रक्कम शासन स्वतः भरते. मात्र पिक विमा काढूनही अनेक शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नसल्याची तक्रार केली जाते.
अलीकडे पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर झालेला असतानाही विम्याचे पैसे मिळत नाहीत.
महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचे सहकार्य देखील केले जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
जर तुमच्याही बाबतीत असेच घडत असेल तर आजचा हा लेख तुमच्या कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण जर पिक विमा मंजूर झाला असेल अन तरीही तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करावे या संदर्भात जाणून घेणार आहोत.
पिक विमा खात्यात जमा होत नसेल तर काय करणार
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पिक विमा मंजूर होऊन देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसेल तर त्यांनी सर्वप्रथम संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना पिक विमा कंपनीकडून रक्कम मिळावी म्हणून वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली पाहिजे.
नोटीस पाठवल्यानंतरही संबंधित पिक विमा कंपनीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात जर पैसे पाठवले गेले नाहीत तर अशावेळी तुम्ही कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करू शकता. शेतकरी बांधव ग्राहक न्यायालयात जाऊन या विरोधात तक्रार देऊ शकता.
तक्रार दाखल केल्यानंतर माननीय न्यायालयाच्या माध्यमातून तुमच्या तक्रारीवर कारवाई केली जाईल आणि यानंतर संबंधित पिक विमा कंपनीला तुमच्या खात्यात विम्याची रक्कम पाठवण्यासाठी आदेश दिले जातील.