For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

बांगलादेशमुळे कांद्याच्या बाजारभावात आणखी घसरण होणार ! नेमकं कारण काय? पहा…

01:13 PM Jan 13, 2025 IST | Sonali Pachange
बांगलादेशमुळे कांद्याच्या बाजारभावात आणखी घसरण होणार   नेमकं कारण काय  पहा…
Onion Rate 2025
Advertisement

Onion Rate 2025 : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आले आहेत. कांदा हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. याची लागवड राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये केली जाते.

Advertisement

या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असून गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर दबावत आले असल्याने शेतकऱ्यांच्या पुढे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. कांदा पिकासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला आहे आणि आता हा खर्च कसा भरून काढायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. कांद्याला अगदीच कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी सुद्धा आहे.

Advertisement

बाजारभावात झालेली घसरण अन त्यामुळे शेतकऱ्यांना बसलेला आर्थिक भुर्दंड यामुळे कांदा उत्पादक आधीच बेजार झालेले असतानाच आता बांगलादेश मधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. बांगलादेश मधून समोर येत असलेल्या या बातमीमुळे आगामी काळात कांद्याचे भाव आणखी घसरणार की काय अशी भीती देखील आता व्यक्त होऊ लागली आहे.

Advertisement

बांगलादेशमुळे कांद्याच्या बाजारभावात आणखी घसरण होणार का?

Advertisement

सध्या भारतात कांदा निर्यातीसाठी 20% शुल्क आकारले जात आहे. निर्यात शुल्कामुळे कांद्याची निर्यात अगदीच संथ गतीने सुरू असून यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतोय. हेच कारण आहे की सरकारने कांदा निर्यात शुल्क हटवले पाहिजे अशी मागणी निर्यातदारांकडून आणि शेतकऱ्यांकडून उपस्थित केली जात आहे.

Advertisement

पण शेतकरी आणि निर्यातदार यांच्या या मागणीकडे सरकार फारसे लक्ष देत नाहीये. शेतकऱ्यांच्या या मागणीवर सरकार मौन बाळगून असून कांद्याच्या मुद्द्यावर सरकारची उदासीनता पुन्हा एकदा पाहायला मिळतेय. अशातच आता बांगलादेशमुळं भारतीय कांद्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वाढत चालली आहे.

कारण म्हणजे बांगलादेशातील वृत्तपत्र 'ढाका ट्रिब्यून'ने यावर्षी बांगलादेशात कांद्याच्या लागवडीत सुमारे 30 टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती दिली आहे. बांगलादेश मध्ये कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे म्हणजेच त्या ठिकाणी कांद्याचे उत्पादन देखील वाढणार आहे. मंडळी भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा बांगलादेशमध्ये निर्यात होत असतो.

आता बांगलादेश मध्ये कांद्याचे उत्पादन वाढणार अशी शक्यता असल्याने त्या ठिकाणी भारतातील कांदा कमी प्रमाणात जाणार आहे. साहजिकच याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसेल. म्हणून बांगलादेश मधून समोर येणारी ही बातमी भारतातील शेतकऱ्यांचे चिंतेचे कारण बनत आहे. बांगलादेश मध्ये कांद्याची लागवड वाढलीय आणि आता त्या ठिकाणी उत्पादन सुद्धा वाढेल अन यामुळे भारतात कांद्याचे दर कमी होऊ शकतात असा अंदाज आहे.

भारतात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कांद्याच्या बाजारभावात 10.85% घसरण झाली आहे. तसेच एका महिन्याच्या काळात कांद्याच्या किमती 43% कमी झाल्या आहेत. म्हणून जर सरकारने निर्यात शुल्क मागे घेण्याचा निर्णय घेतला नाही तर किमती आणखी घसरण्याची शक्यता वर्तवली जात असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलीये.

Tags :