नमो शेतकरीचा सहावा हप्ता कधी मिळणार ? यादीत नाव कस पाहायच ? वाचा….
Namo Shetkari Yojana : दोन महिन्यांपूर्वी नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. 5 ऑक्टोबर 2024 ला नमो शेतकरीचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरीचा पाचवा हप्ता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.
यामुळे, राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, येत्या काही दिवसांनी आता नमो शेतकरीचा आणि पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, फेब्रुवारी 2025 मध्ये नमो शेतकरी चा सहावा आणि पीएम किसानचा 19 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान आता आपण नमो शेतकरी योजनेच्या यादीमध्ये शेतकऱ्यांचे नाव कसे बघायचे ? या योजनेचे तुम्ही लाभार्थी आहात का ? हे कस बघायचं याच संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
नमो शेतकरीच्या लाभार्थी यादीत नाव कसे चेक करायचे?
नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला मिळणार की नाही? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://nsmny.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला Beneficiary Status असा पर्याय दिसणार आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकावा लागणार आहे. जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहिती नसेल किंवा विसरला असल्यास बाजूला Know Your Registration No या पर्यायावर क्लिक करा.
यात तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर किंवा आधार नंबर एंटर करू शकता. मोबाईल नंबर टाकल्यास आपल्याला ओटीपी पाठवला जाईल. मोबाईलवर आलेला ओटीपी आणि वर दिलेला कॅप्चा कोड जसाच्या तसा टाकायचा आहे.
मग गेट डेटावर क्लिक करायचे आहे. मग शेतकऱ्याचे नाव, त्याचा नोंदणी क्रमांक स्क्रीनवर दाखवला जाईल. हाच नोंदणी क्रमांक वापरून तुम्हाला मग तुमचे बेनिफिशयरी स्टेटस चेक करता येणार आहे.
ते कस तर तुम्हाला एकदा की, नोंदणी क्रमांक समजला की मग पुन्हा मुख्य मेनूवर या. मग पुन्हा एकदा नोंदणी क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून ओटीपी मागवायचा आहे. ओटीपी आणि कॅप्चा कोड टाकून गेट डाटा पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर स्क्रीनवर तुमची माहिती तुम्हाला दिसणार आहे. नाव, पत्ता, यापूर्वीचे हफ्ते आलेले आहेत का? आले नसतील तर का आले नाहीत, याची माहिती आपल्याला दिसेल. जर तुम्हाला स्क्रीनवर ही माहिती दिसली नाही तर तुमचे लाभार्थी यादीत नाव नाही असं समजा.