For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार ? समोर आली मोठी अपडेट

04:07 PM Jan 15, 2025 IST | Sonali Pachange
नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार   समोर आली मोठी अपडेट
Namo Shetkari Yojana
Advertisement

Namo Shetkari Yojana : केंद्रातील मोदी सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरु करण्यात आली होती. त्या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर एका वर्षात 6 हजार रुपये पाठवले जातात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते.

Advertisement

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना राबवली जाते.

Advertisement

5 ऑक्टोबर 2024 रोजी वाशिम येथे झालेल्या कार्यक्रमात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याची रक्कम राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. तसेच 5 ऑक्टोबरला पीएम किसान सन्मान योजनेच्या 18व्या हफ्त्याचे 2 हजार रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आलें होते.

Advertisement

म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानचा 18वा आणि नमो शेतकरीचा 5वा हप्ता सोबतच देण्यात आला आहे. दरम्यान आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो असा दावा प्रसारमाध्यमांमध्ये होतोय.

Advertisement

त्यामुळे नमो शेतकरीचा हप्ता कधी मिळणार हा सवाल आहे. दरम्यान आज आपण नमो शेतकरी योजनेचा पुढील सहावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होऊ शकतो याबाबत सविस्तर अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

केव्हा जमा होणार नमो शेतकरीचा 6वा हफ्ता?

मीडिया रिपोर्टनुसार, महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता येत्या काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. नमो शेतकरीचा पाचवा हप्ता हा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्यासोबतच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

दरम्यान आता नमो शेतकरी चा सहावा हप्ता पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हफ्त्यासोबतच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आली आहे.

जर काही कारणास्तव पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत तर अशावेळी नमो शेतकरीचे पैसे हे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यानंतर काही दिवसांनी वितरित होण्याची शक्यता आहे.

पण तरीही नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्येच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हा पैसा जमा होईल या संदर्भात सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. यामुळे नमो शेतकरीचा पुढील हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Tags :