पीएम किसाननंतर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख ठरली !
मंडळी, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या बाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. खरे तर केंद्रातील सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता 24 फेब्रुवारीला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार अस म्हटलय. अर्थातच येत्या चार दिवसांनी या योजनेचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
दरम्यान आता याच योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी योजनेबाबत प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान आज आपण नमो शेतकरी योजनेचा पुढील सहावा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? याबाबतची नवीन अपडेट जाणून घेणार आहोत. नमस्कार मी…..आणि तुम्ही पाहत आहात कृषी मराठी आमचं नवं यूट्यूब चैनल.
मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्र पुरस्कृत योजना. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात, पण हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी टाकले जात नाहीत, प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजाराचा हप्ता या पद्धतीने हे सहा हजार रुपये एका वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.
म्हणजेच या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षात दोन हजाराचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण 18 हप्ते देण्यात आले आहेत. या योजनेचा अठरावा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालाय आणि म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून या योजनेचा पुढील 19 वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता.
दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना नुकत्याच काही दिवसांपूर्वी पीएम किसान योजनेचा पुढील 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अशी माहिती दिली. या योजनेचा 19 वा हप्ता हा बिहार राज्यातील भागलपूर येथून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे.
पण, यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा पुढील सहावा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. खरे तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. 5 ऑक्टोबर 2024 रोजी वाशिम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पात्र शेतकऱ्यांना पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा हप्ता दिला.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्यावेळी उपस्थित होते. म्हणूनच आता पीएम किसानचा 19वा आणि नमो शेतकरीचा 6वा हप्ता सोबतच मिळणार का असा प्रश्न विचारला जातोय. मंडळी, केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यासाठी राज्य सरकारने 2023 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेतुन आत्तापर्यंत 5 हप्त्याचं वितरण करण्यात आलं आहे.
दरम्यान, पीएम किसानच्या 18 हप्त्यासाठी पात्र ठरलेली शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 6 व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेली आहेत. राज्यात पीएम किसानसाठी 91 लाख शेतकरी पात्र ठरले होते. त्यामुळे नमोच्या 6व्या हप्त्याचं वितरण या शेतकऱ्यांना करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पण यावेळी पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा लाभ सोबतच मिळणार नाही.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा होणार अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे तर दुसरीकडे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा मार्चमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येईल असे म्हटले जात आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा निधीचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. तर राज्य सरकारच्या नमो सन्मान निधी योजनेचा 6 वा हप्ता 1 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात येईल.
मंडळी, तुम्हाला काय वाटतं? पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे सोबतच यायला हवेत का? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार.