कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

महावितरणने सुरू केली ‘लकी डिजिटल' ग्राहक योजना ! ग्राहकांना स्मार्टफोन अन स्मार्टवॉच मोफत मिळणार

07:51 PM Dec 19, 2024 IST | Krushi Marathi
Mahavitaran Yojana News

Mahavitaran Yojana News : महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी महावितरणने एक नवीन योजना सुरू केली आहे. महावितरणने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली असून या अंतर्गत ऑनलाइन बिल भरणाऱ्या ग्राहकांना स्मार्टफोन आणि स्मार्ट वॉच वितरित केले जाणार आहेत.

Advertisement

ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने ही योजना महावितरण च्या माध्यमातून राबवली जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

कशी आहे महावितरणची नवीन योजना ?

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणने सुरू केलेल्या या योजनेसाठी ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीन वेळा ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीजबिले भरणाऱ्या ग्राहकांना या योजनेअंतर्गत स्मार्टफोन आणि स्मार्ट वॉच दिली जाणार आहे.

Advertisement

या अशा ग्राहकांस या योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. ऑनलाइन विज बिल भरण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करणे हेतू ही योजना राबवली जात आहे. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकानी ऑनलाइन विज बिल भरावे असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे.

Advertisement

०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाइन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही, अशा ग्राहकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत एप्रिल, मे व जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे तीन लकी ड्रॉ काढले जाणार आहेत आणि या लकी ड्रॉ च्या माध्यमातून विजयी ग्राहकांना स्मार्टफोन आणि स्मार्ट वॉच बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. हा लकी ड्रॉ मात्र ऑनलाइन पद्धतीने काढला जाणार आहे.

प्रत्येक महिन्याच्या लकी ड्रॉ मध्ये पाच विजयी ग्राहकांना स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच मिळणार आहेत. लकी ड्रॉ घोषित करण्यापूर्वीच्या महिन्याच्या अंतिम दिवशी ग्राहकाची थकबाकीची रक्कम रु.१० पेक्षा कमी असावी. एक ग्राहक केवळ एका बक्षिसासाठी पात्र असेल, याची नोंद मात्र ग्राहकांनी घ्यायची आहे.

अर्थातच 31 मार्च 2024 नंतर सलग तीन वीज बिल ऑनलाईन भरणा करणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. नक्कीच महावितरणने सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढणार असून यामुळे विज बिल भरणाऱ्यांची संख्या ही वाढणार आहे.

Tags :
Mahavitaran Yojana News
Next Article