For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

वसूबारसच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील 'या' बाजारात कांद्याला मिळाला सर्वाधिक दर ! वाचा सविस्तर

08:59 PM Oct 28, 2024 IST | Krushi Marathi
वसूबारसच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील  या  बाजारात कांद्याला मिळाला सर्वाधिक दर   वाचा सविस्तर
Maharashtra Onion Rate
Advertisement

Maharashtra Onion Rate : आज वसूबारस अन आजपासून दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. दीपोत्सवाचा सुरुवातीलाच मात्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्यातील काही बाजारांमध्ये आज कांद्याचे दर सुधारले आहेत.

Advertisement

खरे तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील बाजारांमध्ये कांदा दर वधारले आहेत. कांदा निर्यातीसाठी लागू असणारे निर्बंध शिथिल झाल्यानंतर कांदा निर्यातीला चालना मिळाली आहे. यामुळे कांद्याचे दरही सुधारले आहेत. परिणामी शेतकऱ्यांमध्ये मोठे प्रसन्न वातावरण आहे.

Advertisement

विशेष बाब अशी की बाजार अभ्यासकांनी आगामी काही दिवस कांद्याचे दर तेजीतच राहतील असे म्हटले आहे. जोपर्यंत नवीन कांदा बाजारात मुबलक प्रमाणात दाखल होत नाही तोपर्यंत कांद्याचे दर तेजीत राहतील असे म्हटले जात आहे.

Advertisement

दरम्यान आज आपण वसुबारसच्या मुहूर्तावर अर्थातच दीपोत्सवाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील बाजारांमध्ये कांद्याला नेमका काय दर मिळतोय या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

आज कांद्याला काय दर मिळाला ?

Advertisement

आज राज्यातील कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज कळवण एपीएमसी मध्ये 9800 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1800, कमाल 5 हजार 775 आणि सरासरी 4300 एवढा भाव मिळाला आहे.

आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान 200, कमाल 5,600 आणि सरासरी 1800 एवढा भाव मिळाला आहे. सोलापूर एपीएमसी मध्ये आज कांद्याची सर्वाधिक आवक झाली होती. या एपीएमसी मध्ये आज तब्बल 62 हजार 139 क्विंटल कांदा आवक झाली.

लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 2300, कमाल 5500 आणि सरासरी 4400 असा भाव मिळाला आहे. लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 2775 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली.

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला किमान पंधराशे, कमाल 5,100 आणि सरासरी 3000 असा भाव मिळाला आहे. या बाजारात आज 5575 क्विंटल कांदा आवक झाली.

Tags :