For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ योजनेतून फवारणी पंप मोफत मिळणार, अर्ज कसा आणि कुठे करावा ?

08:11 PM Dec 10, 2024 IST | Krushi Marathi
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज   ‘या’ योजनेतून फवारणी पंप मोफत मिळणार  अर्ज कसा आणि कुठे करावा
Maharashtra Farmer Scheme
Advertisement

Maharashtra Farmer Scheme : शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या अनुषंगाने एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.

Advertisement

ही एक राज्य पुरस्कृत योजना आहे. म्हणजे या योजनेसाठी राज्य शासनाकडून फंडिंग होत आहे. याचा आर्थिक भार राज्य शासन उचलत असून या योजनेच्या माध्यमातून कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे.

Advertisement

याच योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप 100% अनुदानावर उपलब्ध करून दिले जात असून यासाठी महाडीबीटीच्या पोर्टलवर अर्ज स्वीकारले जात आहेत. mahadbt.maharashtra.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 100% अनुदानावर फवारणी पंप मिळवण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे.

Advertisement

या योजनेसाठी शेतकऱ्यांना वरच सांगितलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड होणार आहे आणि यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप दिला जाणार आहे.

Advertisement

यामुळे या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.

Advertisement

वेबसाईटवर आल्यानंतर शेतकऱ्यांनी "युजर आयडी व पासवर्ड" टाकायचा आहे. मग "अर्ज करा" या बाबीवर क्लिक करायचे आहे. पुढे "कृषी यांत्रिकीकरण" बाबीवर क्लिक करावे. "मुख्य घटक" बाबीवर क्लिक करावे.

"तपशील" बाबीवर क्लिक करून "मनुष्यचलित औजारे घटक निवड" मध्ये जात "यंत्र / औजारे व उपकरणे - पिक संरक्षण औजारे" या पर्यायावर क्लिक करायचे आहे. मग "बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन)" बाब निवडणे आणि जतन करायचे आहे. अशा तऱ्हेने शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.

Tags :