कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! आता ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 15,000 रुपये

01:20 PM Dec 24, 2024 IST | Krushi Marathi
Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना आता दरवर्षी 15 हजार रुपये मिळणार आहेत. केंद्रातील सरकारने 2019 साली पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.

Advertisement

दरम्यान, या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने आणखी सहा हजार रुपयांची भर घातली आहे. यासाठी राज्य शासनाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे.

Advertisement

राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी पीएम किसान चे सहा हजार आणि नमो शेतकरीचे 6000 असे एकूण 12 हजार रुपये दिले जात आहेत. मात्र या दोन्ही योजनांच्या माध्यमातून दिले जाणारे पैसे हे एकाच वेळी मिळत नाही. हे पैसे एकरकमी देण्याऐवजी दोन हजार रुपयांचा एकता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते.

म्हणजेच पीएम किसान अंतर्गत एका वर्षात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत एका वर्षात तीन हप्ते मिळतात. पी एम किसान बाबत बोलायचं झालं तर आत्तापर्यंत या योजनेचे एकूण 18 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

Advertisement

दुसरीकडे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण पाच हप्ते पात्र शेतकऱ्यांना देण्यात आले असून या दोन्ही योजनांचे पुढील हप्ते फेब्रुवारी 2025 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती प्रसारमाध्यमांमधून समोर येत आहे.

Advertisement

असे असतानाच आता राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आता राज्यातील शेतकऱ्यांना 12,000 ऐवजी 15 हजार रुपये मिळणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. फडणवीस यांनी काल सोमवारी ही घोषणा केली असून राज्य शासनाने हा निर्णय घेतला तर नक्कीच याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

खरे तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 15000 रुपये देऊ अशी घोषणा केली होती.

यानुसार आता देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना 15 हजार रुपये देण्याबाबतचा निर्णय होईल असे संकेत दिले आहेत. किसान सन्मान दिवसानिमित्त कृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्थेत आयोजित केलेल्या शेतकरी तसेच ग्रामीण विकास लाभार्थी संमेलनात ते बोलत होते.

Tags :
Farmer SchemeGovernment schemeMaharashtra FarmerMaharashtra Farmer SchemeMaharashtra newsSarkari Yojanaschemeyojana
Next Article