For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय केव्हा होणार ? कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तारीखचं सांगितली

02:25 PM Jan 05, 2025 IST | Krushi Marathi
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय केव्हा होणार   कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तारीखचं सांगितली
Maharashtra Farmer News
Advertisement

Maharashtra Farmer News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने पुन्हा आमचं सरकार आल्यास राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल अशी घोषणा केली होती. भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख केला होता. म्हणून आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार राज्यात स्थापित झाले असल्याने शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

Advertisement

महायुती सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधीपर्यंत घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातोय. दरम्यान आता राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Advertisement

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय केव्हा घेतला जाणार याबाबत कृषी मंत्र्यांनी मोठी माहिती दिली आहे. साखर संकुलमध्ये काल शनिवारी (दि.4) कृषिमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली.

Advertisement

या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरती ताण आला असल्याची कबुली राज्याचे दिली. तसेच, राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होईल, असं आश्वासन दिलं.

Advertisement

कृषिमंत्री महोदय काय म्हणतात ?

Advertisement

कालच्या पत्रकार परिषदेत कृषी मंत्री कोकाटे यांनी, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय सहकार विभागाकडे येतो, कृषी खात्याकडे नाही. परंतु, यावर माहिती मागविण्याचे काम सुरू आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर थोडा बोजा पडला आहे.

राज्याची आर्थिक परिस्थिती चांगलीही नाही आणि वाईटही नाही. त्यामुळे कर्जमाफीबाबतचा निर्णय थोडा मागे- पुढे होईल, आर्थिक स्थिती बरी झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर चार- सहा महिन्यांत निर्णय घेतील, असं वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे.

म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे येत्या चार सहा महिन्यात कर्जमाफी बाबतचा निर्णय घेण्याची शक्यता माणिकराव कोकाटे यांनी वर्तवली आहे.

Tags :