For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

लाडकी बहिण योजना : डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता सोबतच मिळणार का ? वाचा…

06:39 PM Dec 13, 2024 IST | Krushi Marathi
लाडकी बहिण योजना   डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता सोबतच मिळणार का   वाचा…
Ladki Bahin Yojana
Advertisement

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त मंत्रिमंडळ विस्ताराची आणि लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरु आहे. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना प्रति महिना पंधराशे रुपयांचा आर्थिक लाभ दिला जात आहे.

Advertisement

आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

Advertisement

दरम्यान आता या योजनेचा पुढील डिसेंबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होणार हा सवाल विचारला जातोय. याच संदर्भात आता एक मोठी माहिती हाती आली आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात या योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र मध्यंतरी मीडिया रिपोर्ट्स मध्ये असा दावा करण्यात आला होता की डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जातील.

Advertisement

पण, अलीकडेच हाती आलेल्या माहितीनुसार या योजनेचा फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता येत्या दोन दिवसात पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

Advertisement

14 जानेवारीला येणाऱ्या मकर संक्रांति सणाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा पैसा पात्र महिलांना एकाच वेळी दिला जाईल असे म्हटले जात होते. पण असे काही होणार नाहीये, येत्या दोन दिवसात महिलांना फक्त डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात या योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या विविध चर्चा सुरू आहेत.

लाभार्थी महिलांच्या घरी जाऊस सर्व्हेक्षण होणार, योजनेचे निकष आणि पात्रता बदलणार, असे बोलले जात आहे. मात्र, असं काही होणार नाही, या केवळ अफवा आहेत, असे देखील मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Tags :