मकर संक्रांतीचा मुहूर्त हुकला ; लाडक्या बहिणींना कधी मिळणार जानेवारी महिन्याचे 1500 रुपये, समोर आली मोठी अपडेट
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असा दावा केला जात होता. पण आता मकर संक्रांति उलटली आहे तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले नाहीत.
यामुळे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हफ्ता कधी मिळणार? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंडळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे पैसे देण्यात आले आहेत.
म्हणजेच एका पात्र महिलेला आतापर्यंत 9000 चा लाभ मिळाला आहे. डिसेंबर महिन्याचे पैसे हे 24 डिसेंबर 2024 पासून पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आणि 31 डिसेंबर पर्यंत सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला.
आता लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या हफ्त्याची प्रतीक्षा असून याच बाबत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्याची रक्कम ही येत्या काही दिवसांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळू शकतो असा दावा आता प्रसार माध्यमांमध्ये होताना दिसतोय. दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी होऊ शकते आणि ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यांना या योजनेतून वगळले जाऊ शकते अशी देखील बातमी समोर येत आहे.
यामुळे जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून राज्यातील किती महिला वंचित राहतील हा मोठा प्रश्न आहे. या योजनेचा राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना लाभ मिळत असून आता जानेवारी महिन्यापासून यातील किती महिला वंचित राहतील हे पाहणे खरंच उत्सुकतेचे ठरणार आहे.
दुसरीकडे सरकारने या योजनेअंतर्गत अर्थसंकल्पानंतर म्हणजेच मार्च महिन्यानंतर 2100 रुपये दिले जातील अशी घोषणा केलेली आहे. यामुळे मार्च महिन्याचा हप्ता 2100 रुपयांचा मिळणार का हे सुद्धा पाणी तेवढेच उत्सुकतेचे राहील.
मंडळी लाडक्या बहिणींचा लाभ हा राज्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील आणि 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दिला जातो. याचा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील रहिवासी महिलांना दिला जात आहे.
तसेच ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिलांना सुद्धा याचा लाभ मिळतोय.