लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट ! ‘या’ निकषांचे आता काटेकोर पालन होणार, 2100 चा हफ्ता एप्रिल 2025 पासूनच मिळणार!
Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेसाठी 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. तीन महिन्यात अडीच कोटी अर्जांची प्रभावीपणे पडताळणी करणे साहजिकच अशक्य होते.
त्यामुळे लाडकी बहिण योजनेसाठी सादर झालेल्या अर्जांची प्रभावी पडताळणी होऊ शकली नाही पण आता या योजनेसाठी दाखल झालेल्या अर्जांची अगदीच काटेकोरं पडताळणी केली जाणार आहे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, चार चाकी वाहन, पाच एकरापेक्षा अधिक जमीन, लाभार्थी दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेतोय का, एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिला याचा लाभ घेतायेत का? या पाच निकषांचे काटेकोर पालन होणार असून यामुळे अनेक महिला या योजनेतुन अपात्र होणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांनाचं याचा लाभ मिळणार आहे. मात्र असे असतानाही निकषांची काटेकोर पद्धतीने पडताळणी निवडणुकीपूर्वी करता आली नसल्याने या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात महिला पात्र ठरल्यात.
यामध्ये अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळाला असेल. हेच कारण आहे की आता या योजनेसाठी सरकारकडून पडताळणी सुरू केली जाणार आहे. पडताळणी नंतर खऱ्या पात्र महिलांना 2100 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल 2025 पासून लाडकी बहिण योजनेसाठी पडताळणीनंतर ज्या महिला पात्र ठरतील त्यांना 2100 रुपयांचा हप्ता मिळेल. फक्त पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्जाची फेर पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान आता आपण या योजनेचे निकष नेमके कसे आहेत याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसे आहेत योजनेचे निकष?
लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दिला जात आहे.
महाराष्ट्रातील रहिवासी महिलांनाचं याचा लाभ मिळतो. तसेच, ज्या महिलांचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिलांना देखील याचा लाभ दिला जात आहे.
या योजनेचा लाभ अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मिळतो.
ट्रॅक्टर वगळता इतर चार चाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ मिळत नाही.
ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेसारख्या इतर शासकीय वैयक्तिक आर्थिक लाभाच्या योजनेचा लाभ मिळतोय त्यांना याचा लाभ मिळू शकत नाही.
पाच एकरापेक्षा अधिक जमीन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळू शकत नाही.