लाडकी बहिण योजनेचा पुढचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार ! भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता. यानंतर महायुतीने राज्यातील महिलांना केंद्रस्थानी ठेवून काही मोठमोठ्या योजनांची घोषणा केली. महायुती सरकारने लाडकी बहिण योजना देखील सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र ठरतात. या अंतर्गत आत्तापर्यंत पाच महिन्यांचे 7500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात सरकारकडून वर्ग करण्यात आले असून आता डिसेंबर महिन्याचे पैसे कधी पर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार या संदर्भात सरकारकडून अधिकृत माहिती समोर आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या दोन-तीन दिवसात लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता सरकारकडून जमा केला जाणार अशी माहिती दिली आहे.
2100 चा हप्ता कधीपासून मिळणार?
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे वाढवले जातील अशी घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या पंधराशे रुपयांचा हप्ता दिला जातोय मात्र महायुतीचे सरकार आले की हा हप्ता 2100 रुपयांचा होईल असे महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते.
यानुसार आता लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आम्हाला 2100 रुपयांचा हप्ता केव्हापासून मिळणार हा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान, राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी लाडक्या बहिणींना येत्या अर्थसंकल्पात 2100 रुपये देण्याबाबतचा विचार करू आणि त्यानंतर त्यांना 2100 रुपयाचा हप्ता मिळेल असे म्हटले आहे.