लाडकी बहीण योजना : ‘या’ तारखेला जमा होणार डिसेंबर महिन्याचे पैसे, नवीन तारीख आली समोर
Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक मोठमोठे निर्णय घेतलेत. अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्यात. लाडकी बहिण योजना देखील सुरू करण्यात आली आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यामुळे आता महिलांच्या माध्यमातून या योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे कधी पर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार असा प्रश्न उपस्थित होतोय.
महत्त्वाचे म्हणजे आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. खरंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने आमच्या सरकार पुन्हा राज्यात आले तर आम्ही या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2100 रुपयाचा लाभ देऊ असे म्हटले होते.
यामुळे आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापित झाले असल्याने महिलांकडून आम्हाला 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार असा प्रश्न विचारला जातोय.
राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात येत्या अर्थसंकल्पात विचार केला जाईल असे म्हटले आहे. म्हणजेच एप्रिल महिन्यापासून पात्र महिलांना 2100 रुपयांचा लाभ दिला जाऊ शकतो.
तत्पूर्वी या योजनेसाठी ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना अजून एकही रुपया मिळाला नव्हता, अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.
शुक्रवारपासून हा थकीत लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर आता डिसेंबरचे पैसे कधीपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेंतर्गत करण्यात आलेल्या काही अर्जांची छाणणी बाकी होती, त्या प्रक्रियेला देखील आता वेग आला आहे.
त्रुटी असलेले अर्ज पुन्हा एकदा भरून द्यावे लागणार आहेत. नक्कीच येत्या दोन-तीन दिवसात जर डिसेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले तर हा लाभ महिलांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.