मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल ! योजनेचे नवे नियम पहा….
महाराष्ट्र सरकारने गेल्यावर्षी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरू केली असून ही राज्यातील सर्वाधिक लाभार्थी संख्या असणारी योजना. या योजनेची घोषणा झाल्यापासून ही योजना मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या योजनेचा प्रत्यक्षात जुलै 2024 मध्ये लाभ मिळाला होता. जुलै महिन्यापासून या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या सात महिन्यांचा लाभ पात्र महिलांना देण्यात आला असून गेल्या काही दिवसांपासून ही योजना पुन्हा एकदा मोठ्या चर्चेत आली आहे आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे बदल देखील करण्यात आले आहेत. खरे तर या योजनेच्या अर्जदारांची सरकारकडून पडताळणी सुरू करण्यात आली आहे, महत्त्वाचे म्हणजे पडताळणीअंती जवळपास पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
दुसरीकडे या योजनेच्या संदर्भात नुकतीच एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून यामध्ये या योजनेच्या नियमात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच प्रत्येक महिन्याची हप्त्याची तारीख देखील आता सरकारकडून सेट करण्यात आली आहे. म्हणजेच आता या योजनेचा हप्ता एका निश्चित तारखेला मिळण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागू करण्यात आलेले नवीन नियम, या योजनेतून ज्या पाच लाख महिलांना वगळण्यात आले आहे त्यांना वगळण्याचे नेमके कारण काय? कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही? आणि नव्या नियमांनुसार कोणत्या तारखेला तुम्हाला हप्ता मिळेल? याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मी…..आणि तुम्ही पाहत आहात कृषी मराठी हे आमचं नवं यूट्यूब चैनल.
नव्या नियमांनुसार कोण अपात्र?
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच माहिती दिली आहे की, 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार काही महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या 2 लाख 30 हजार महिलांना, 65 पेक्षा जास्त वय असलेल्या 1 लाख 10 हजार महिलांना, कुटुंबाच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या महिलांना तसेच नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला आणि स्वेच्छेने योजनेतून बाहेर पडलेल्या महिलांना या योजनेतून वगळले गेले आहे. आतापर्यंत एकूण 5 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
योजनेचे नवे नियम कसे आहेत ?
नव्या नियमांनुसार, प्रत्येक लाभार्थी महिलेने दरवर्षी जून ते जुलै दरम्यान eKYC करणे अनिवार्य असेल. म्हणजेच जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुमचा हप्ता थांबवला जाईल. योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र महिलांना eKYC करावी लागणार आहे. लाभार्थी महिला हयात आहे की नाही हे चेक करण्यासाठी हा नवा नियम तयार करण्यात आला आहे.
तसेच सरकारने ठरवले आहे की दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थींना मिळणार आहे. म्हणजेच जर तुम्ही पात्र असाल आणि सर्व निकष पूर्ण करत असाल, तर तुम्हाला दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तुमचा आर्थिक लाभ मिळेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे. ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेतून वगळले जाईल.
सरकार तुमचे इनकम टॅक्स रेकॉर्ड आणि इतर आर्थिक दस्तऐवज तपासणार आहे. सरकारकडून योजनेत अनियमितता टाळण्यासाठी जिल्हा स्तरावर फेरतपासणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. सरकारकडे संपूर्ण डेटा असेल आणि योग्य महिलांनाच लाभ मिळेल याची खात्री केली जाईल. अपात्र ठरलेल्या महिलांना सूचना दिली जाणार असून जर चुका झाल्या असतील, तर त्या दुरुस्त करण्याची संधी मिळू शकते.
मित्रांनो, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेत आता काही मोठे बदल करण्यात आले आहेत. म्हणून जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल, तर दरवर्षी eKYC करायला विसरू नका आणि तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न निकषात बसते का ? याची खात्री करा. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, तर लाइक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार.