लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! या तारखेपासून मिळणार 2100 रुपये, समोर आली मोठी माहिती
Ladki Bahin Yojana News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधानसभा निवडणुकीनंतर एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातून धडा घेत महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्यात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही देखील अशीच एक कल्याणकारी योजना. या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून झाली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळतोय. आत्तापर्यंत पात्र महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे देण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे आता लवकरच डिसेंबर महिन्याचे पैसे सुद्धा मिळणार आहेत.
तत्पूर्वी या योजनेसंदर्भात एक मोठे अपडेट समोर येत आहे. खरंतर महायुतीने आपल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे पंधराशे रुपयांवरून 2100 रुपये करू अशी ग्वाही दिली आहे.
यामुळे अनेकांच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत कधीपासून 2100 रुपये मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान आता याचं संदर्भात नवीन माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लवकरच 2100 रुपये मिळणार आहेत.
याची अंमलबजावणी 21 एप्रिल 2025 पासून होण्याची शक्यता आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची तरतूद केली जाईल अन मग याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा २,१०० रुपये देण्याचे वचन आपल्या जाहीरनाम्यात दिले.
स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जाहीर सभेतून ही घोषणा दिली. त्याला लाडक्या बहिणींनी साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.
राज्यातील २८८ आमदारांमध्ये तब्बल १८७ आमदारांना एक लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी सरकार लवकरच याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांनी राज्यात नवीन सरकार सत्ता स्थापित करेल, नव्या मुख्यमंत्र्याचा, मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होईल अन त्यानंतर याबाबतचा निर्णय होणार आहे.
हा निर्णय पुढील वर्षी सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात होईल असे सुद्धा सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.