कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

डिसेंबरच्या हप्त्यापोटी 1500 रुपये मिळणार की 2100 ? मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मोठी माहिती

02:37 PM Dec 20, 2024 IST | Krushi Marathi
Ladki Bahin Yojana Latest Update

Ladki Bahin Yojana Latest Update : विधानसभा निवडणुकीच्या आधी महिलांना केंद्रस्थानी ठेवून गेल्या शिंदे सरकारने काही मोठमोठ्या योजनांची अंमलबजावणी सुरू केली. लाडकी बहिण योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही राज्यातील सर्वाधिक लाभार्थी संख्या असणारी योजना म्हणून ओळखली जात असून याचा राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना लाभ मिळतोयं असा दावा करण्यात आला आहे.

Advertisement

या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. पण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांना मिळणाऱ्या हफ्यात वाढ केली जाईल, अन महिलांना 2100 रुपयांचा हप्ता दिला जाईल असे अश्वासन महायुतीने दिले होते.

Advertisement

यामुळे या योजनेचा पुढील हप्ता पंधराशे रुपयांचा मिळणार की 2100 रुपयांचा हा मोठा सवाल आहे. दरम्यान, विधानसभेतील गुरुवारच्या सत्रात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

फडणवीस म्हणालेत की, महायुती सरकारने सुरु केलेली एकही योजना बंद होणार नाही. तसेच लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होतील. आम्ही दिलेली सर्व आश्वासन पूर्ण केली जाणार आहेत.

Advertisement

याबद्दल कोणतीही शंका नाही. याच बरोबर योजनेच्या निकषात कोणताही बदल केला जाणार नाही. पात्र, महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. अर्थातच आता हिवाळी अधिवेशन संपले की लगेचच लाडकी बहिण योजनेचा हप्ता मिळणार आहे.

Advertisement

आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण पाच हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांना मिळाले असून आता हिवाळी अधिवेशन संपल्या बरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे.

पण डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 चा मिळणार की 2100 चा हा मोठा सवाल आहे. विधानसभाआधी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे अश्वासन दिले होते.

यामुळे लाडक्या बहिणींना पुढील हफ्त्यात १५०० मिळतील की १५०० असा प्रश्न पडला आहे. यावर फडणवीस म्हणाले की, डिसेंबरच्या हप्त्यामध्ये मात्र आधीप्रमाणेच १५०० रुपये मिळणार आहेत. अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना २१०० मिळू शकतील.

Tags :
Government schemeLadki Bahin YojanaLadki Bahin Yojana Latest UpdateLadki Bahin Yojana NewsSarkari Yojanaschemeyojana
Next Article