मकर संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी ! अशा प्रकरणांमध्ये लाडक्या बहिणीकडून दंडासहीत पूर्ण रक्कम वसूल केली जाणार ?
Ladki Bahin Yojana : महायुतीने लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला, म्हणून राज्यातील महायुती सरकारला खडबडून जाग आली आणि त्यांनी राज्यातील सर्वच घटकातील नागरिकांसाठी मोठमोठ्या योजनांची घोषणा केली. या योजनांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात मोठी आणि गेम चेंजर योजना ठरली.
पण आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेल्या याच लाडकी बहीण योजनेचे नियम कठोर केले जाणार आहेत. यामधील त्रुटी दूर करण्यासंदर्भात हलचालींना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळतं आहे.
सरकारकडून लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी केली जाणार असल्याचे दिसते. दरम्यान, या योजनेच्या अर्जांची छाननी होणार अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यानंतर नियम डावलून लाभ मिळवलेल्या महिलांच्या खात्यातून रक्कम काढून घेतल्याच्या बातम्या सुद्धा मध्यँतरी समोर आल्यात.
अशातच आता ज्या लाडक्या बहिणींनी या योजनेच्या नियमांचे पालन केलेले नाही अशा बहिणीकडून दंडासहीत या योजनेची रक्कम वसूल केली जाणार का? यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांच्या विधानानंतर या चर्चांना अधिक जोर आलाय.
मंडळी, लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी या योजनेचे एकूण पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते.
जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच महिन्यांचे हप्ते निवडणुकीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा झाले आणि महायुतीने सत्ता स्थापन केल्यानंतर या योजनेचा डिसेंबर महिन्याचा पैसा महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला. या योजनेअंतर्गत सध्या पंधराशे रुपये दिले जात आहेत मात्र राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ही रक्कम 2100 रुपये होण्याची शक्यता देखील आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने आमचे सरकार पुन्हा राज्यात आले तर आम्हीही रक्कम वाढवणार असे आश्वासन दिले होते, यानुसार अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकतो असा अंदाज आता वर्तवला जात आहे.
अशा साऱ्या घडामोडी सुरू असतानाच काल अर्थातच रविवारी येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना या योजनेबाबत मोठे विधान केले आणि यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भुजबळ म्हणालेत की, "आधी मला जे कळलं होतं तेव्हा नियम असा काहीतरी होता की, घरातील दोन महिलांना देताना त्यांची मोटरगाडी नसावी, दुचाकी नसावी, उत्पन्नासंदर्भात नियम होते.
गरीब लोकांना देण्यात यावं असा उद्देश होता. पण लोकांनी सरसकट फॉर्म भरल्याने त्यांनी घेतला फायदा," पुढे बोलताना आ. भुजबळ यांनी आता माझं म्हणणं असं आहे की, एक अपिल केलं पाहिजे लोकांना.
जे या नियमांमध्ये बसत नाहीत त्यांनी स्वत:हून आपली नावं काढा म्हणून. जे पैसे दिले गेले ते परत मागण्यात काहीही अर्थ नाही. ते परत मागण्यात येऊ नयेत. या पुढे लोकांना सांगावं या नियमांमध्ये न बसणाऱ्यांनी स्वत: नावं काढून घ्यावीत. मात्र त्यानंतरही नावं नाही काढली तर मात्र त्यांच्याकडून दंडासहीत वसुली करण्यात येईल.
मागचं जे झालं ते आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करुन टाकलं पाहिजे, असे मोठे विधान केले आहे. यामुळे अपात्र महिलांकडून या योजनेची रक्कम दंड असेल वसूल केली जाणार का? सरकारचा नेमका निर्णय काय असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.