फडणवीस सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय! ‘या’ तारखेला जमा होणार डिसेंबर महिन्याचा हप्ता
Ladki Bahin Yojana : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. या शपथविधी सोहळ्याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असतानाही सरकार स्थापित होत नव्हते यामुळे महायुतीवर विरोधकांच्या माध्यमातून जोरदार निशाणा सातला जात होता.
पण अखेर कार काल महायुतीचा शपथविधी सोहळा संपन्न झाला असून यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये. दरम्यान मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच एक महत्त्वाची राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील झाली.
मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक काल पार पडली. यानंतर लाडकी बहीण योजने संदर्भातही मोठी घोषणा करण्यात आली आहे. कालच्या पहिल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पीसी आयोजित केली होती.
या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी सरकारच्या भूमिकेबाबत माहिती दिली. पुढे कोणत्या कामांवर सरकारचा फोकस राहील या संदर्भात ते या पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या पत्रकार परिषदेत मोठी माहिती दिली.
एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेत लाडकी बहिण योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा होणार या संदर्भात प्रश्न विचारला गेला होता. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी, आजच आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली.
या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत सूचना केल्या आहेत. तातडीनं डिसेंबरचा हफ्ता लाभार्थी पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे अशा सूचना आम्ही दिल्या आहेत. आम्ही जे निर्णय घेतले ते फक्त कागदावरच राहिले नाहीत तर त्याची अंमलबजावणी देखील लगेचच केली.
त्यामुळे आम्हाला पुन्हा जनतेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मी पूर्वी जेव्हा सीएम होता तेव्हा मी स्वत:ला मुख्यमंत्री नाही तर सीएम म्हणजे कॉमन मॅन समजायचो, आता उपमुख्यमंत्री आहे तर मी आता स्वत: डीसीएम अर्थात डेडिकेटेड कॉमन मॅन समजतो असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
कशी आहे लाडकी बहीण योजना?
मागील शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
महिलांनी स्वतः आत्मनिर्भर बनावे, किरकोळ कारणांसाठी आवश्यक असणाऱ्या पैशांकरिता त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पाच महिन्यांचे पैसे देण्यात आले आहेत.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासी महिलांना आणि ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना लाभ दिला जातोय.