हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ! सरकारने घेतला मोठा निर्णय, ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार लाभ
Ladki Bahin Yojana : आज राज्याच्या विधिमंडळातील हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस. काल फडणवीस सरकारचा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि आज हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. दरम्यान, या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. खरंतर, लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू झाली.
या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे पैसे जमा झाले आहेत. म्हणजेच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे एकूण सात हजार पाचशे रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
आता या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार याची साऱ्या महिलांना प्रतीक्षा आहे. दुसरीकडे महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे रुपयांवरून 2100 रुपये करू अशी ग्वाही दिली आहे.
यामुळे महिलांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत 2100 रुपये कधीपासून मिळणार? हा देखील मोठा सवाल आहे. दरम्यान मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील निर्णय हा अर्थसंकल्पात घेतला जाईल आणि यासाठी अर्थसंकल्पात तरतूद होईल असे संकेत दिले आहेत.
म्हणजेच 2,100 रुपयाचा लाभ हा नवीन वर्षातच मिळणार आहे. तत्पूर्वी मात्र लाडकी बहिण योजनेसंदर्भात हिवाळी अधिवेशनात आज मोठा निर्णय झालाय. आज अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी 35 हजार 788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनासठी देखील तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल बांधणीसाठी 1500 कोटी रुपये, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटी, मुंबई मेट्रोसाठी अर्थ सहाय्य म्हणून 1212 कोटी, आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतुद सुद्धा करण्यात आली आहे.
लाडकी बहिण योजना आणि अन्नपूर्णा योजनेसाठी सरकारने आज कोट्यावधी रुपयांची तरतूद केली असल्याने लाडक्या बहिणींसाठी ही नववर्षाची मोठी भेट समजली जात आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी सरकारने कोट्यावधी रुपयांची तरतूद केली असल्याने आता लवकरच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार असे दिसते. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत डिसेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील असे संकेत आता मिळतं आहेत.