For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

महिला असो की पुरुष सर्वांनाचं मिळणार 1500 रुपये ! 'या' सरकारी योजनेचा कोणाला फायदा मिळणार ?

03:18 PM Oct 08, 2024 IST | Krushi Marathi
महिला असो की पुरुष सर्वांनाचं मिळणार 1500 रुपये    या  सरकारी योजनेचा कोणाला फायदा मिळणार
Government Scheme
Advertisement

Government Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, शेतमजूर आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. राज्य शासनाने अलीकडेच लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.

Advertisement

ही योजना राज्यातील महिला वर्गासाठी सुरू करण्यात आली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. पण, लाडकी बहिण योजनेप्रमाणेचं राज्य शासनाने श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना देखील सुरू केली आहे.

Advertisement

या अंतर्गतही ज्येष्ठ नागरिकांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. राज्यातील निराधार आणि गरीब वृद्ध नागरिकांना या योजनेअंतर्गत वार्षिक 18 हजार रुपयांचा म्हणजेच महिन्याला पंधराशे रुपयांचा आर्थिक लाभ दिला जात आहे.

Advertisement

ही योजना सामाजिक न्याय विभागाकडून राबवली जाते. मात्र या योजनेअंतर्गत फक्त आणि फक्त 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांनाच लाभ मिळतो. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना लाभ दिला जातो.

Advertisement

पण, श्रावण बाळ योजनेअंतर्गत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मग पुरुष असो की महिला साऱ्यांनाच या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये दिले जातात.

Advertisement

ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण या योजनेसाठीच्या पात्रता, यासाठी अर्ज कुठे करायचा, कोण-कोणती कागदपत्रे लागतात? याबाबत माहिती पाहणार आहोत.

श्रावणबाळ योजनेच्या पात्रता

या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांना मिळतो. किमान पंधरा वर्षांपासून महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळतो. याचा लाभ 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिला जातो. 21 हजार रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील नागरिक या योजनेसाठी पात्र ठरतात.

अर्ज कुठे करणार?

जर तुम्हीही या योजनेसाठी पात्र असेल आणि तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन अन ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्ही तालुक्याच्या तहसील कार्यालयातील अटल सेतु केंद्राला भेट देऊ शकतात किंवा ऑनलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करु शकतात.

कोण कोणती कागदपत्रे लागतात?

श्रावण बाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना आधार कार्ड, रेशन कार्ड, वोटर आयडी आणि बँक पासबुक आवश्यक आहे.त्याचसोबत रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो, उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो.

Tags :