महिलांसाठी खुशखबर ! आता लाडक्या बहिणींना महिन्याला 7 हजार रुपये मिळणार ; पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जाहीर करणार ‘ही’ नवीन योजना
Government Scheme : विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचा सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत मोठा फायदा झाला.
दरम्यान आता केंद्रातील सरकार महिलांना केंद्रस्थानी ठेवून एक नवीन योजना सुरू करणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा शुभारंभ करतील अशी माहिती हाती आली आहे.
केंद्रातील मोदी सरकार विमा सखी योजना नावाची एक नवीन योजना जाहीर करणार असून या अंतर्गत लाडक्या बहिणींना सात हजार रुपये मिळणार आहेत.
मात्र यासाठी सरकारने काही अटी ठेवलेल्या आहेत. अशा परिस्थितीत आज आपण केंद्रातील मोदी सरकारकडून सुरू होणाऱ्या विमा सखी योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहे विमा सखी योजना
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणातून विमा सखी योजनेचा शुभारंभ करणार आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी (LIC) या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीकडून ही योजना राबवण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. याच्या माध्यमातून आगामी तीन वर्षाच्या कालावधीत दोन लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न सरकारकडून होणार आहे. या योजनेचा लाभ अठरा वर्षांवरील महिलांना दिला जाणार आहे.
याचा लाभ हा फक्त दहावी पास महिलांना मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून तीन वर्ष महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण काळात महिलांना वेतन मिळणार आहे. स्टाईपेंड म्हणून या काळात एक निश्चित रक्कम दिली जाणार आहे.
पहिल्या वर्षी सात हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 6000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये प्रति महिना या पद्धतीने स्टाईपेंड दिला जाईल अशी माहिती समोर आली आहे.
तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विमा सखींना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याचीही संधी दिली जाऊ शकते.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35000 महिलांना विमा एजंट म्हणून रोजगार दिला जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात पन्नास हजार महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे. नक्कीच ही योजना महिला सक्षमीकरणासाठी फायद्याची ठरणार आहे. याच्या माध्यमातून देशभरातील लाखो महिला लाभान्वीत होणार आहेत.