कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा होणार ट्रॅक्टर व इतर यंत्रांचे अनुदान! शासनाने दिली 15 कोटी 15 लाख रुपयांच्या निधी वितरणास मान्यता

09:51 AM Jan 23, 2025 IST | Sonali Pachange
farmer scheme

Farmer Subsidy Scheme:- केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेती क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते.

Advertisement

अगदी याचप्रमाणे जर आपण बघितले तर कृषी क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण होऊ लागली असून यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात येते. या अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्रांच्या खरेदीवर अनुदान देण्यात येते.

Advertisement

याचा अनुदानासंबंधी एक महत्त्वाचे अपडेट सध्या समोर आली असून केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या तिसऱ्या हप्त्यासाठी 15 कोटी 15 लाख रुपयांच्या वितरणास राज्य सरकारने बुधवारी मान्यता दिली व त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकऱ्यांना लवकरच मिळणार कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाचे तिसऱ्या हप्त्यासाठीचे अनुदान
केंद्रीय पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पंधरा कोटी पंधरा लाख रुपयांच्या वितरणास राज्य सरकारने बुधवारी मान्यता दिली आहे व त्यामुळे आता सर्वसाधारण,

Advertisement

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर यंत्रांचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरात लवकर आता हे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयात देण्यात आलेले आहे.

Advertisement

2024 ते 25 या आर्थिक वर्षात राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार नऊ कोटी नऊ लाख रुपये तर राज्य सरकार सहा कोटी सहा लाख रुपये देणारा असून असा मिळून 15 कोटी 15 लाख रुपयांचा निधी आता मंजूर करण्यात आला आहे.इतकेच नाही तर हा मंजूर निधी कृषी आयुक्ताकडे वर्ग देखील करण्यात आला आहे.

या निधीमधून आता अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी पाच कोटी 66 लाख 67 हजार, सर्वसाधारण प्रवर्गासाठी पाच कोटी, अनुसूचित जमातीसाठी चार कोटी 48 लाख 33 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेतून किती मिळते अनुदान?
या योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती आणि जमाती तसेच महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना किमतीच्या 50% किंवा एक लाख पंचवीस हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांना 40% किंवा एक लाख रुपये यापेक्षा जे कमी ते अनुदान मिळते.

Next Article