कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील ‘या’ उड्डाणपुलाच्या कामाला मिळणार गती; लागणारा निधी अशा पद्धतीने उभारला जाणार

04:10 PM Jan 16, 2025 IST | Sonali Pachange

Pune Flyover:- पुणे हे वेगाने विकसित झालेले आणि अजूनही विकसित होत असलेले महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असून या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मिटावी याकरिता पुणे शहरांमध्ये अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत.

Advertisement

या प्रकल्पांपैकी पुण्यामध्ये होत असलेला रिंगरोड तसेच मेट्रो प्रकल्पाची कामे खूप महत्त्वाचे आहेत व त्यासोबत काही ठिकाणी महत्त्वाच्या उड्डाणपूलांचे कामे देखील सुरू आहेत. उड्डाणपूलांच्या अनुषंगाने बघितले तर पुणे येथील सिंहगड रस्त्यावर असलेल्या विठ्ठलवाडी ते फनटाईम या ठिकाणी देखील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.

Advertisement

नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या मिटावी याकरिता पुणे महानगरपालिकेने राजाराम पूल चौक ते फनटाईम थियटर यादरम्यान अडीच किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. यामध्ये राजाराम पूल चौकातील उड्डाणपूल सुरू झाला आहे व विठ्ठलवाडी ते फनटाईम या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.

जवळपास 86 टक्क्यांच्या आसपास या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले आहे व उर्वरित कामासाठी मात्र निधीची आवश्यकता आहे व त्याकरिता आता आवश्यक असलेला दहा कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे मिळवण्याकरिता लवकरच स्थायी समिती समोर प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Advertisement

दहा कोटी यांचा निधी वर्गीकरणाद्वारे उभारला जाणार

Advertisement

सिंहगड रस्ता अर्थात नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी याकरिता महानगरपालिकेच्या माध्यमातून राजारामपुरी चौक ते फनटाइम थिएटर दरम्यान अडीच किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. यामध्ये विठ्ठलवाडी ते फनटाईम या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम 86.50% टक्के झालेले आहे.

2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये या कामासाठी 55 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. परंतु ही रक्कम डिसेंबर 2024 मध्ये संपली आहे. परंतु या उड्डाण पुलावर रस्ता उभारणी तसेच कठड्यांचे बांधकाम व रंगरंगोटी करणे इत्यादी कामे अजून बाकी आहेत. या सगळ्या कामांकरिता मे 2025 पर्यंत 23 कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे व विभागाकडे 13 कोटी रुपये सध्या आहेत.

त्यामुळे आवश्यक दहा कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून द्यावेत असा प्रकारचा प्रस्ताव प्रकल्प विभागाच्या माध्यमातून स्थायी समिती पुढे ठेवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नक्कीच या रखडलेल्या कामाला आता गती मिळेल अशी एक शक्यता आहे.

या कारणासाठी 39 मेट्रो पिलरचे फाउंडेशन तयार केले जात आहे

पुण्यामध्ये खडकवासला ते हडपसर या दरम्यान मेट्रो मार्गाची उभारणी करण्यात येणार असून या मेट्रो मार्गाच्या कामामुळे या उड्डाणपुलाचा रॅम्प तोडावा लागू नये याकरिता उड्डाणपुलाच्या चढ उताराच्या ठिकाणी एकूण 39 मीटर पिलरचे फाउंडेशन तयार केले जात आहे व या मेट्रोच्या कामासाठी एकूण 32.93 कोटी रुपये खर्च येणार आहे.

सध्या हा खर्च महापालिका करत असली तरी भविष्यात तो महामेट्रो कडून वळता करून घेतला जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Next Article